HomeनांदेडMahadev Koli community : जटाळे यांनी आदिवासी महादेव कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न...

Mahadev Koli community : जटाळे यांनी आदिवासी महादेव कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न राष्ट्रपती भवनात मांडले

नवीन नांदेड| आदिवासी जमातीत कोळी महादेव (tribal Mahadev Koli community) समाजातील जात वैधता प्रमाणपत्रासाठी होणारी नागरिक व विध्यार्थी यांच्या समस्या तात्काळ सोडविली जाव्यात अशी मागणी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रपतींनी भारतातील आदिवासी समाजाच्या विकासाचा संदर्भात संवाद बैठक 21 जुलै राष्ट्रपती भवन दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील वसरणी येथील सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक तथा भाजपाचे नांदेड अनुसूचित जमाती मोर्चा महानगर अध्यक्ष विश्वनाथ नामदेव जटाळे यांनी लेखी निवेदन दिले.

भारताच्या राष्ट्रपती यांनी भारतातील आदिवासी समाजाच्या विकासाच्या संदर्भात संवाद बैठक 21 जुलै रोजी राष्ट्रपती भवन येथे आदिवासी क्षेत्रातील प्रख्यात व विविध क्षेत्रातील व्यक्तीमत्व यांच्याशी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आठ राज्यातून 40 जणांना निमंत्रीत करण्यात आले होते ,यावेळी महाराष्ट्र राज्यातुन सहा जणांचा समावेश होता,यात नांदेड जिल्ह्यातील वसरणी येथील सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक विश्वनाथ जटाळे यांच्या समावेश होता.

आदिवासी समाजाच्या कोळी महादेव या जमातीतील आदिवासींना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यास अडचणी येत आहेत व उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर वैधता प्रमाणपत्र वितरण होत असल्याने शिक्षणास व नोकरी संबंधीतांना त्रास सहन करावा लागत आहे,गरीब आदिवासी माणूस व विध्यार्थी न्यायालया पर्यंत पोहचु शकत नसल्याने मराठवाड्यातील व नांदेड जिल्ह्यातील अनेक समाज बांधव वैधता प्रमाणपत्र पासून वंचित आहेत.

शासनाकडून संबंधिताची चौकशी करून न्याय मिळावा असे पत्र राष्ट्रपती यांना दिले आहे, यावेळी केंद्रीय आदिवासी मंत्री जे.एल.ऊराव, राज्यमंत्री दुर्गादास ऊईके,भाजपा जनजाती मोर्चा अध्यक्ष खा.समीर ओराव, महाराष्ट्र जिल्हा संघटन मंत्री किशोर काळकर, महामंत्री प्रकाश गेडाम, सुदर्शन शिंदे,राजश्री काळे, रमेश मावसकर यांच्यी उपस्थिती होती. राष्ट्रपती यांनी प्रथमच नवी दिल्ली येथे बोलवल्या या आदिवासी समाजाच्या प्रश्ना बाबत घेतलेल्या आढावा संदर्भ बैठकी मुळे जात वैधता प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती यांनी संबंधीतांना संवाद साधताना उपस्थित असलेल्या तुम्ही जिल्हा परिषद शाळेतुन शिक्षण घेऊन शासनाच्या विविध योजना घेऊन शिक्षण पुर्ण करुन शासकीय सेवेत केलेल्या कार्याची उल्लेखनिय दखल घेत केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून आपणं समाजासाठी केंद्र व शासनाच्या विविध योजना अंतर दृष्टीने हातभार लावण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले, यावेळी राष्ट्रपती महोदया समवेत स्नेह भोजन घेतले.

प्रथमच झालेल्या या संवाद बैठक मुळे आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपा पक्षाच्या पदाधिकारी यांना या बैठकीस बोलवल्यांना अपेक्षा बाळगल्याचे सांगून नांदेड जिल्हा भाजपाचे ग्रामीण अध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे,शहर जिल्हा महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजूरकर व सरचिटणीस शितल खांडील ,सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका यांच्या शिफारसी मुळे संवाद बैठकीला जावुन गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आदिवासी कोळी महादेव समाज प्रश्न उपस्थित केला असल्याचे सांगून सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक तथा भाजपा महानगर अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष विश्वनाथ जटाळे यांनी सांगितले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments