birth of Saint Phulaji Baba ; किनवट तालुक्यातील 33 गावा मधून संत फुलाजी बाबा यांचा जन्मोत्सव साजरा – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील 33 गावामधून श्री परमहंस सद्गुरु फुलाजी बाबा यांचा शंभरावा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पटनापूर येथील जन्मोत्सव कार्यक्रम तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा या परिसरात प्रसिद्ध असलेले व तेलंगणा येथील पटनापुर येथे समाधीस्थ झालेले परमहंस संत फुलाजी बाबा यांचा शंभरावा जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.यामध्ये भजन, कीर्तन ,ध्यानधारणा, महाआरती, व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.हा कार्यक्रम किनवट तालुक्यातील गोकुंदा, टिंगनवाडी ,चिखली खुर्द, थारा, डोंगरगाव(ची) ,बेलोरी धानोरा, सावरगाव, तल्लारी ,जलधरा यासह एकूण 33 गावात हा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच तेलंगणा राज्य सरकारने पटनापुर येथे या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास विदर्भ, मराठवाडा, व तेलंगणातील लाखोच्या संख्येने भावी वक्त उपस्थित होते.

विश्वनाथ नखाते यांनी शंभर आरतीचे नियोजन केले होते. केशव दादा वामनदादा व गुरु माय यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.येथील सिद्धेश्वर संस्थान पटनापुर मंडळ जैनूर जिल्हा कुमराम भीम असिफाबाद यांच्यावतीने महाआरोग्य शिबिराचे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम 30 ऑगस्ट रोजी संपन्न झाला.या आरोग्य शिबिरा करता , डॉ.मारुती वाकोडे, डॉ मनीषा बोंबले, डॉ महादेव फोले, डॉ मंजुषा मुरमुरे, डॉ शिवशंकर बुरकुले ,डॉ दिनेश, प्रदीप बोडके ,डॉ जयश्री बोडके, डॉ ज्ञानेश्वर कोठुळे ,डॉ सुभाष वानोळे,  डॉ रामचंद्र ढोले, डॉ गजानन तायडे, , डॉ संदीप खूपसे, नागेश खोपशे यांनी सहभाग घेऊन हा आरोग्य शिबिर संपन्न केले.

या शिबिरासस विविध कार्यक्रमासाठी रेवन रेडी मुख्यमंत्री तेलंगणा प्रदेश, भाटी विक्रम उपमुख्यमंत्री आंध्र तेलंगणा प्रदेश ,बासरी अनुसया मंत्री तेलंगणा, कोंडा सुरेखा मिनिस्टर तेलंगणा तसेच येथील खासदार आमदार विविध पक्षाचे कार्यकर्ते सर्व खात्याचे उच्चपदस्थ अधिकारी यांची उपस्थिती होती.या सोहळ्यासाठी किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम ,हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, तसेच कळमनुरी चे माजी आमदार संतोष टारपे उमरखेडचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्यासह अनेक नेतेमंडळीची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button