Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - मराठवाड्यात कोट्यवधींची वीज चोरी – NNL
नांदेड लेख July 7, 2024

मराठवाड्यात कोट्यवधींची वीज चोरी – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 7, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Illegally hook-tapping from high voltage power-line, causing power theft. Shot
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , जालना , बीड, धाराशिव ,लातूर तसेच नांदेड, हिंगोली व परभणी या आठही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात पाच-दहा नव्हे तर तब्बल ३१ कोटींची वीज चोरी उघडकीस आली आहे. मागील आर्थिक वर्षातील एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत महावितरणने ही वीज चोरी उघडकीस आणली. विशेष म्हणजे मराठवाड्यातील संभाजीनगर शहरात सर्वाधिक ग्राहक हे चोरून वीज वापरणारे निघाले. तसे पहिले तर संपूर्ण मराठवाड्यातच वीजचोर मुजोर झाले आहेत. महावितरण ने २८ कोटी ७९ लाख रुपये दंडाची रक्कम या वीज चोरट्यांकडून वसूल देखील केली आहे. एकीकडे नियमित वीज बिल भरणारे ग्राहक मुकाट्याने दरवाढ सहन करतात व विजेची बिले नियमित भरत असतात. परंतु त्याउलट मोफत व चोरून वीज वापरणारे आजही तेवढ्याच दिमाखात व फुकटात वीज चोरीचा फायदा लाटत आहेत. अशा वीज चोरट्यांवर कुठे ना कुठे कडक व दंडासह शिक्षा देखील होणे तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा मराठवाड्यात हा प्रकार काही थांबणार नाही, हे देखील तेवढेच खरे आहे.‌

मराठवाड्यात ३१ कोटींची वीज चोरी उघडकीस आली, ही धक्कादायक बाब असली तरी यापेक्षा आणखी कितीतरी वीज चोरटे आजही उथळ माथ्याने फिरत आहेत. वीज चोरट्यांना शोधून त्यांच्याकडून २८ कोटी ७९ लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात १५३३ वीज ग्राहकांनी चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यापैकी संभाजीनगर शहरात ७४४ तर संभाजीनगर ग्रामीण भागात ३४९ व जालना जिल्ह्यात ४४० वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली . महावितरणने संभाजीनगर परिमंडळात १४ कोटी २४.३९ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली . छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.

मराठवाड्यातील आठ जिल्हयात एप्रील २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात वीज चोरांविरुद्ध धडक मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये ४,६९८ वीज मिटरची तपासणी करण्यात आली. यात ३,७०४ मिटरमध्ये वीज चोरी आढळून आली. ४,१७,२१,३४४ युनिट वीज चोरी प्रकरणी ३१ कोटी ९७ लाख ११ हजार रुपयांच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली आहे. तर २८ कोटी ७९ लाख ४४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे. परंतु आणखी तीन कोटी रुपयांच्या जवळपास रक्कम वीज चोरट्यांकडून वसूल करणे बाकी आहे. खरे पाहिले तर विजेची चोरी व्हायलाच नको होती. चोरी झाली असेल तरी याला जे कोणी जबाबदार अधिकारी असतील त्यांना यासाठी काही ना काही दंड देखील लावणे तेवढेच गरजेचे आहे. जेणेकरून सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना देखील जरब बसेल. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कुठे ना कुठे दुर्लक्ष केले म्हणून हा प्रकार घडला याला देखील नाकारले जाऊ शकत नाही. शासनाचा गले लठ्ठ पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी हे देखील कुठे ना कुठे या प्रकरणाला तेवढेच दोषी आहेत. यादृष्टीनेही याकडे पाहिले गेले पाहिजे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नदिड, लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविली. विद्युत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो. तसेच कलम १३५ मध्ये मिटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सर्व्हिसवायर टॅप करणे व कलम १३८ मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तू चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. वीज चोरी पकडण्याची मोहीम काही ठराविक काळापूरतीच चालविण्यात आली . यापुढेही सदरील मोहीम चालू राहिली असती तर कदाचित हा आकडा दुपटीने वाढला असता अशी कबुली एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

अनधिकृत विजेचा वापर करू नये, अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. आगामी काळात वीज चोरांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविणे गरजेचे आहे. लातूर परिमंडळातील बीड जिल्ह्यात २७९ चोरीचे वीज ग्राहक आढळून आले . तर धाराशिव जिल्ह्यात २५१ व लातूर जिल्ह्यात ३६८ वीज चोरटे तपासणी पथकाच्या हाती लागले. नांदेड परिमंडळ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात ३१३ वीज चोरटे सापडले. हिंगोली जिल्ह्यात २७१ वीज चोरट्यांना शोधण्यात पथकाला यश आले . तर परभणीत मात्र सर्वाधिक ६८९ वीज चोरटे आढळून आले. लातूर परिमंडळात ९ कोटी २५ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आली. तर नांदेड परिमंडळात आठ कोटी ४६ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आली.

वीज चोरी करणारे ग्राहक केवळ मराठवाड्यातच आहेत , असे नव्हे. संपूर्ण राज्यात व देशभरात असे वीज चोरटे नक्कीच असणार. परंतु त्यांचा शोध घेण्यासाठी एक मोठी यंत्रणा कार्यान्वित करणे तेवढेच गरजेचे आहे. कारण एकीकडे राजकारणी मंडळी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन देतात. तर दुसरीकडे नियमित विजेचा भरणा करणारे ग्राहक मुकाट्याने वीज बिल भरत असतात. परंतु समाजात अशी काही मंडळी आहे, जी विजेची चोरी करून फुकटात हा फायदा लाटत आहेत. अशा वीज चोरांना शोधणे महावितरणच्या समोर एक मोठे आव्हान ठरणार आहे. दुसऱ्यांदा वीज चोरी करणाऱ्यांचा वीजपुरवठा किमान तीन महिने कायमस्वरूपी बंद केल्यास विजेची चोरी नक्कीच रोखली जाणार आहे . परंतु असे कठीण निर्णय घेत असताना अधिकाऱ्यांना तेवढी मदत, मानसिक शक्ती किंवा वरिष्ठांचा पाठिंबा मिळाला तरच या सर्व बाबी शक्य आहेत.

 लेखक…..डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र, abhaydandage@gmail.com

kotyavadhinchi visa theft Marathwadyat
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleअखेर तब्बल नऊ दिवसा नंतर तुरळक प्रमाणात काही भागात पिण्याचे पाणी नळाला -NNL
Next Article मुख्यमञ्याच्या ह्या लाडक्या बहिणी राहणार लाभापासुन दुर … NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL

July 1, 2024

Police Action ; वाजेगाव मुदखेड रोडच्या ब्रिजखाली दोन जणांना अटक, तलवार व मोटार सायकल जप्त

July 2, 2025

Sugarcane in 2.5 acres of farm near Ekamba village : हिमायतनगर तालुक्यातील एकंबा गावालगतच्या शेतातील २.५ एकरमधील ऊस शॉर्टसर्कटमुळे जळाला -NNL

November 10, 2024

Mahur Street Lights : माहूरवासीयांची तीन वर्षांची प्रतीक्षा संपली – महामार्गावरील पथदिवे सूरू

September 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

first fast : सफुरा शेख उबेदुल्ला हिने केला पहिला रोजा पूर्ण

MLA Mohanrao Hambarde ; शिवपुराण कथास्थळी अडकलेल्या भाविकांच्या मदतीसाठी आमदार मोहनराव हंबर्डे धावले – NNL

Water supply from Limbotin Dam for Loha city : लोहा शहरासाठी लिंबोटीं धरणातून पाणीपुरवठा

Dr.Annabhau Sathe Jayanti : हिमायतनगर येथे डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न – NNL

The accused in the crime of forcible theft : जबरी चोरी व खंडणीचे गुन्हयातील आरोपीस चोरीचे मोबाईलसह घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?