क्राईमनांदेड

gambling : मनाठा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा – ₹1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त

हदगाव| नांदेड जिल्ह्यातील मनाठा पोलिसांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत मौजे पिंपरखेड (ता. हदगाव) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जुगार्‍यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण ₹1,04,300 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक12 ऑगस्ट 2025 वेळ: दुपारी 3.50 वाजटा पिंपरखेड, ता. हदगाव, जि. नांदेड येथे निरंजन जयवंतराव वाकोडे (60), अंकुश प्रभु पाईकराव (35), भारत लक्ष्मण कुसूमकर (35), क्रांतीकुमार संजय आगळे (27), अनिल साहेबरा कंधार (35), दाजीबा तुळशीराम साखरे (60) सर्व रा. पिंपरखेड, ता. हदगाव हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या अंदर-बाहर नावाचा जुगार हारजित वर खेळत व खेळवित असतांना मिळून आले.

त्यांच्याकडून नगदी ₹4,300/- दोन मोटार सायकली (प्रत्येकी किंमत ₹50,000/-) असा एकूण: ₹1,04,300/- रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्यावर गुरनं 164/2025, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे व पथकाने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button