नवीन नांदेड l श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल लिटरसी या विषयावर विशेष वार्षिक शिबिर मौजे गुंडेगाव तालुका जिल्हा नांदेड येथे 21 जानेवारीपासून ते 27 जानेवारी पर्यंत संपन्न होत आहे.
या शिबिराच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात डॉ शंकर विभुते यांनी त्यागाशिवाय माणूस विकसित होऊ शकत नाही असे उद्गागार काढले.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ दिलीप काठोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ भागवत पस्तापुरे व्यासपीठावर प्रा.डॉ.शिवाजी शिंदे, प्रा.डॉ.सत्वशीला वरघंटे, गावचे सरपंच हंबर्डे यांची उपस्थिती होती तसेच डॉ शंकर विभुते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रश्न पडणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. सद्यस्थितीत नवनिर्मिती होताना दिसत नाही. जगात ज्याच्याकडे आत्मविश्वास असेल तोच टिकतो. भाषण करण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा. आपला आपले बोलणे गोड असेल तर माणसे जुटतात असे सांगून त्यांनी “माननीय आमदार गणपतराव” ही कथा सांगून शिबिरार्थ्यांना व गावकऱ्यांना खळखळून हसवले.

यानंतर प्रा.डॉ .भागवत पस्तापुरे यांनी डिजिटल डायजेशन आणि शैक्षणिक उपयोगिता या विषयावर शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपण डिजिटल मोबाईलचा चांगला उपयोग करायचा हे आपण शिकले पाहिजे. कोरोनात आपण ऑनलाइन शिक्षण घेतले. मोबाईलचा वापर शिक्षणासाठी करावा. मोबाईल मुळे आपण संवाद इतरांशी कमी करत आहोत. हे जग गतिशील झाले आहे. जग हे डिजिटल होणार आहे.

युट्युब,व्हाट्सअप, फेसबुक, विकिपीडिया,स्नॅपचॅट इत्यादीचा वापर आपण बुद्धीचा विचार करूनच करावा त्यात नेहमी मग्न राहू नये. डिजिटल युगामध्ये जितकी चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण स्वीकाराव्यात.शिक्षणात घेत असताना संपूर्ण नॉलेज मोबाईल मध्ये उपलब्ध आहे. एखादी संकल्पना आपण मोबाईल मध्ये टाकली त्याचे संपूर्ण माहिती त्यात येते त्याच्यातील चांगली माहिती आपण घ्यावी अशी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.डॉ.शिवाजी शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन तेजल लिंगायत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रिया पिलगुलवार यांनी केले ,सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावकरी व शिबिरार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्या करीता दिलीप इंगोले, देवबा मोडक,शुभम खोकले, किशोर खिल्लारे, स्नेहा कवठेकर, अश्विनी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.