Dr. Shankar Vibhute ; त्यागाशिवाय माणूस विकसित होत नाही – डॉ. शंकर विभुते
नवीन नांदेड l श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल लिटरसी या विषयावर विशेष वार्षिक शिबिर मौजे गुंडेगाव तालुका जिल्हा नांदेड येथे 21 जानेवारीपासून ते 27 जानेवारी पर्यंत संपन्न होत आहे.
या शिबिराच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात डॉ शंकर विभुते यांनी त्यागाशिवाय माणूस विकसित होऊ शकत नाही असे उद्गागार काढले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ दिलीप काठोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ भागवत पस्तापुरे व्यासपीठावर प्रा.डॉ.शिवाजी शिंदे, प्रा.डॉ.सत्वशीला वरघंटे, गावचे सरपंच हंबर्डे यांची उपस्थिती होती तसेच डॉ शंकर विभुते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रश्न पडणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. सद्यस्थितीत नवनिर्मिती होताना दिसत ना...
