नांदेडकरियर

Ek ped ma ke naam : “एक पेड मा के नाम” उपक्रमाद्वारे वाढदिवसाचे वेगळेपण — तळेगाव शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

नांदेड| दिनांक ३० जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तळेगाव, केंद्र तामसा, तालुका हदगाव जी. नांदेड येथे शालेय विद्यार्थ्यांसोबतच शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ ईळेगाव यांच्या वाढदिवसानिमित्त “पेड मा के नाम” हा आगळावेगळा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. तळेगाव हे मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकाचे अग्रगण्य गाव असून हीच शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणारी शाळा आहे.

याबद्दल शाळेतील शिक्षक वाडकर, सूर्यवंशी, बोईनवाड, मोकले तसेच शिक्षिका शिराढोणकर, कानडखेडकर, मुळावकर, जोशी, शेंडे, पाटील, गोपलवार, स्वामी, सावंत, राठोड, कल्याणकर व शाळेचे मुख्याध्यापक नागनाथराव ईळगावे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल नवले, देवानंद हुंडेकर यांचा ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव मुंडकर आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, बिलोली शाखेचे अध्यक्ष बालाजी गेंदेवाड यांच्या हस्ते शाल, पुस्तक व बेल वृक्ष भेट देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले गोविंदराव मुंडकर यांनी सर्वप्रथम गावातील स्वातंत्र सैनिकांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच पुढे आपल्या प्रभावी भाषणात शाळेच्या कार्याचे विशेष कौतुक करताना म्हटले, “शाळा ही संस्कारांचे केंद्र असून तळेगाव शाळेतील शिक्षक मूल्याधारित शिक्षण प्रभावीपणे देत आहेत.”

तालुकाध्यक्ष बालाजी गेंदेवाड यांनी पर्यावरण संवर्धना विषयी मार्गदर्शन करत बेल वृक्षाचे सामूहिक रोपण सुचवले. तसेच, “आज लावलेल्या झाडाचा वाढदिवस पुढील वर्षी साजरा करणे ही एक प्रेरणादायी साखळी ठरेल,” असे प्रतिपादन केले. “झाडांची भेट देणं व त्याचे रोपण करणे ही काळाची गरज आहे,” हेही त्यांनी ठामपणे नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावी पद्धतीने सूर्यवंशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ व रोपट्यांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक नागनाथ ईळेगावे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले. सामाजिक जाणिवा, पर्यावरण भान आणि मूल्यनिष्ठ शिक्षणाचा संगम असलेला हा उपक्रम इतर शाळांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button