Wednesday, May 13

Nagpanchami : कारला येथे नागपंचमीच्या शिराळाच भक्तीमय वातावरणात विसर्जन

हिमायतनगर| ग्रामीण भागात यावर्षी नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला असुन, कारला येथे शिराळ देव मांडून दिवसभर गावातील महिलांनी पारंपारिक गाणे गायन करून सण साजरा केला. संस्कृती प्रमाणे देवाच पूजन करून सायंकाळी विसर्जन करण्यात आले आहे.

IMG 20250730 WA0035 Nagpanchami : कारला येथे नागपंचमीच्या शिराळाच भक्तीमय वातावरणात विसर्जन

हिमायतनगर तालुक्यात गावोगावी नागपंचमीच्या सणाला शिराळ सण उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो. या शिराळ देवाची कारला येथे गेल्या अनेक वर्षापासून परंपरा कायम असुन, नागपंचमीच्या सणाला दुसऱ्या दिवशी या शिराळ मांडण्यात येतो. शिराळ च्या भोवताली महिलां पारंपरिक भक्तीमय गीत सादर करण्यात येत असते श्रावणातला पहिला सण नागपंचमी नागपंचमीला नागाची पूजा करतात या सणाला सांस्कृतिक परंपरा आहे .

IMG 20250730 WA0034 Nagpanchami : कारला येथे नागपंचमीच्या शिराळाच भक्तीमय वातावरणात विसर्जन

कारला येथे बुधवारी नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला असून शिराळ पुजन करून टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन करण्यात आले आहे. यावेळी पोलिस जमादार नवाब पठाण, पोलिस पाटील साईनाथ कोथळकर, मारोती पाटील लुम्दे, रामराव पाटील कदम, दत्ता चिंतलवाड, केशव रासमवाड, रामराव लुम्दे, अशोक बोंपीलवार, दत्ता यमजलवाड,गजानन मिराशे, आनंद सुर्यवंशी,जनार्दन मुठेवाड, जांबुवंत मिराशे, नाथा मोरे, उत्तम रासमवाड, निळकंठ मोरे,अभय मिराशे, यांच्यासह महिला पुरुष भाविकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!