किनवट,परमेश्वर पेशवे। किनवट येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रथमता देशाचे उद्योगपती रतनजी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.या मेळाव्याच्या प्रसंगी व्यासपीठावर बोलत असताना तुम्ही प्रदीप नाईक यांना आमदार करा प्रदीप नाईक यांना मंत्री करायची जबाबदारी मी घेते. कारण महाराष्ट्रात येणार सरकार हे महाविकास आघाडीचेच असणार आहे. प्रदीप नाईक यांना मी जवळून ओळखते मी गेल्या दहा वर्षात भाजपात असल्याने कदाचित प्रदीप नाईक हे पडले असतील. मी पण भाजपात राहून गेली दहा वर्षभर वनवासच भोगला. मि निवडणूक लढवेल अथवा लढवणार नाही पण सक्रिय राजकारणातच राहणार आहे.


मी कायमस्वरूपी तुमची जमानतदार म्हणून किनवट माहूर मतदारसंघाच्या पाठीशी उभे राहणार आहे असे मत सूर्यकांता पाटील यांनी या पक्ष सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त केले. तर भविष्यातील आमदार हे प्रदीप नाईकच आहेत असे मत भगवानराव आलेगावकर जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केले. याच व्यासपीठावर बोलत असताना माधवराव किनाळकर यांनी एवढा मोठा पक्षप्रवेश सोहळा मी कधीही बघितला नाही सत्तेवर असलेली पक्षातील मंडळी हि ई.डी.सी.बीआय.ची भीती दाखवून पक्षांतर करत आहेत. गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकार ही चालत असून न्याय यंत्रणा सुद्धा यांना घाबरत आहे असे मत याप्रसंगी माजी राज्यमंत्री माधवराव किनाळकर यांनी व्यक्त केले.



या पक्षप्रवेश सोहळा व संवाद बैठकीच्या कार्यक्रमाप्रसंगी भाजपातील पुरुषोत्तम ऐकावार माहूर, दत्ता पाटील कदम चेअरमन सेवानिवृत्त वनाधिकारी कुंभारवाड वानोळा सर्कलमधील भाजपाचे पदाधिकारी किशोर पवार प्राध्यापक दिलीप राठोड माहूर, सरपंच श्रीकांत जाधव , तोटंबा येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी डी के जाधव ,बळीराम राठोड ,लक्ष्मण राठोड माजी सरपंच, ,ईश्वर जाधव रिठा येथील सामाजिक कार्यकर्त प्रकाश चव्हाण ,सुशील चव्हाण शिवसेना धामणधरी दत्तू पाटील सरपंच मलकजाम ,सुरेश काळे चिखली ,सावरगाव ,मांडवा, चिखली खुर्द ,नागझरी ,दहेली, कुपटी, कोसमेट, यासह विविध गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांमध्ये प्रवेश केला.



या कार्यक्रमास माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील ,माजी राज्यमंत्री माधराव किनाळकर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव आलेगावकर जांभरुणकर बि .डी .प्रांजली ताई रावणगावकर जिल्हाध्यक्ष, प्राध्यापक महनोदीन, मीना पेठवडकर, विश्वंभर भोसीकर प्रकाश गब्बा राठोड तालुका अध्यक्ष समाधान जाधव, साजिद खान गजानन मुंडे सभापती ,दत्तराव मोहिते अनिल पाटील कराळे ,रोहिदास चव्हाण ,दिनकर दहिफळे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष,,बालाजी बामणे, शिवाजी घोगरे सभापती ,डॉक्टर भगवान गंगासागर ,मनोज राठोड ,शिवराम जाधव ,मधुकर राठोड, शेख जब्बार, शेखअनवर अरुण आळणे जाहिरोदिन खान, गणपत राठोड, बाबुराव पाटील ,शेख उस्मान भाई, दिलीप जमादार दासु तोटावाढ ,कुंभारवाड ,बंडू नाईक ,राहुल नाईक, संतोष जाधव ,फिरोजखान दोसांनी नगराध्यक्ष,बंडू भुसारे ,नम्रता मनोज कीर्तने अनुसया जमादार, प्रवीण मॅकलवार ,गजू पाटील सोळंके श्याम साखरे, मारुती गड्डमवार माजी सरपंच, शिवाजी जंगिलवाड,यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची व हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



