Suryakanta patil ; प्रदीप नाईक यांना तुम्ही आमदार करा मी जमानतदार होते….. सुर्यकांता पाटील माजी केंद्रीय मंत्री -NNL
किनवट,परमेश्वर पेशवे। किनवट येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रथमता देशाचे उद्योगपती रतनजी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.या मेळाव्याच्या प्रसंगी व्यासपीठावर बोलत असताना तुम्ही प्रदीप नाईक यांना आमदार करा प्रदीप नाईक यांना मंत्री करायची जबाबदारी मी घेते. कारण महाराष्ट्रात येणार सरकार हे महाविकास आघाडीचेच असणार आहे. प्रदीप नाईक यांना मी जवळून ओळखते मी गेल्या दहा वर्षात भाजपात असल्याने कदाचित प्रदीप नाईक हे पडले असतील. मी पण भाजपात राहून गेली दहा वर्षभर वनवासच भोगला. मि निवडणूक लढवेल अथवा लढवणार नाही पण सक्रिय राजकारणातच राहणार आहे.
मी कायमस्वरूपी तुमची जमानतदार म्हणून किनवट माहूर मतदारसंघाच्या पाठीशी उभे राहणार आहे असे मत सूर्यकांता पाटील यांनी या पक्ष सोहळ्याच्य...
