किनवट, परमेश्वर पेशवे। शहरातील रेल्वे गेट ते मांडवा नागझरी व पुढे हाच रस्ता आदिलाबाद (तेलंगणा )ला जोडला जाणार आहे. या महत्वपूर्ण राज्य रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असल्याने आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नातुन या कामासाठी निधी मिळाला असल्याने सां.बा. कार्यालयांने काम चालू केले आहे. परंतु या महत्वाच्या वर्दळीच्या रस्ताचे काम थातूरमातूर पद्धतीने होवू नये तसेच सुमारे सहा ते सात कोटी रुपय मंजुर असलेले हे काम दर्जेदार ,रुंद व नियोजनपूर्वक अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे. अशी मागणी जनतेतून व्यक्त केले जात आहे.

किनवट शहरातुन पुर्वकडे जाणाऱ्या सरस्वती महाविद्यालय परिसरातील सरस्वती कॉलनी, हेडगेवार कॉलनी ,जिजामाता कॉलनी इतर कॉलन्या सहित नागझरी ,वंजारवाडी , मांडवा, घोगरवाडी, ई. गावांना जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते .किनवट शहरातील नगरपरिषद डि.पी.प्लान नुसार रेल्वे गेटपासुनपुढे जाणारा हा रस्ता 24 मीटर रुंदीचा आहे, परंतु प्रत्यक्षात हा रस्ता उतर बाजूला असलेल्या शासकीय वनविकास महामंडळ कार्यालयाने अतिक्रमण करून तारफिनीशीगं व गेट लावल्याने अरुंद झाला आहे.त्यामुळे वाहतूकीत अडधळे येत आहेत.

या रस्त्यावर दहा फुटापासुन ते पंचवीस फुट भर रस्त्यावर या शासनाच्याच कार्यालयाने अतिक्रमण केले आहे.परिसरातील नागरिक आणि विकास प्रेमी काही लोकांनी याबाबत आमदार भीमराव केराम यांच्या कडे तक्रार करुन ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी सां.बा.ला सुचना दिलेल्या आहेत. सध्या सां.बां .च्या अंतर्गत खाजगी कंञाटदाराने या रस्त्याचे काम चालू केले आहे.परतुं जागेवर कामाचे फलक लावले नसल्याने कामाची माहीती जनतेला मिळत नसल्याने काम बोगस होणयाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता अथवा कर्मचारीवर्ग जागेवर दिसुन येत नाही. त्यामुळे हया रस्त्याचे कामाबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे .वनविकास महामंडळ या कार्यालयाच्या मुजोर प्रशासनाने रस्त्यावर गेट लावल्याने अत्यंत अरुंद रस्ता झाला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी निवेदनही दिली आहेत.


परंतु सां.बा. कार्यालयाने अतिक्रमणे काढण्यासाठी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. भुमीअभिलेख कार्यालयाकडे रस्ता मोजून देण्याबाबत अर्ज देण्यात आल्याचे सांगून वेळ मारून नेत आहेत. रस्ता रुंद करून अदांजपञकानुसार आवासीय क्षेञ असलेल्या दक्षिणेकडे सी.सी.नाली व उतरेकडे नाली खोदकाम करण्यात येणार होते. त्यानंतरच रस्ताचे काम चालु केले जाणार होते. परंतु तसे न करता रस्त्याचे काम चालु केले आहे.

परंतु अगोदर या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता रुंद करण्यात यावे .त्या नतंरच रस्त्याचे काम करावे. तसेच रस्त्याचे काम दर्जेदार व अंदाज पत्रकानुसार करावे . कामाच्या ठिकाणी कामाचे सविस्तर नोंद असलेले फलक जनतेच्या माहीतीसाठी अगोदर लावण्यात यावे अशीही मागणी केली जात आहे.नसता सां.बां.प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा जनतेतून देण्यात येत आहे.

