ration card : एकदाच लग्न करणे सोपे! मात्र… रेशनकार्ड बनविणे झाले अवघड

हदगांव, शेख चांदपाशा| नवीन नियमावलीनुसार रेशनकार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची वाढविण्यात आली आहे. या कागदपत्रांची जुळवा जुळव करतांना एकदाचे लग्न करणे सोपे. मात्र हदगांव तहसिल मधून रेशन कार्ड काढणे अवघड झाले आहे. असा प्रतय नवीन रेशन कार्ड काढणा-यांना येत आहे.

हदगांव तालुक्यात एकूण 117 स्वस्त धान्याची दुकाने आहेत. लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या यामुळे दमछाक होत आहे. यामुळे सध्या नवीन रेशनकार्ड बनविणे अवघड झाले असल्याचा प्रत्यय सध्याला येत आहे. सार्वजनिक वितरण धोरणा नुसार प्रत्येक नागरिकाला रेशनकार्ड अर्थात शिधापत्रिका देण्यात येते. या कार्डाच्या आधारे जीवनावश्यक वस्तू माफक दरात विकत घेता येतात.

दारिद्रय रेषेखालील, दारिद्र्यरेषेवरील, अंत्योदय योजनेतील कुटुंबांना वेगवेगळ्या रंगाचे रेशनकार्ड दिले जाते. नवीन रेशनकार्ड काढण्यासाठीही कागदपत्र आवश्यक गॅसबुकची झेरॉक्स, कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्याची खात्याची पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स, सर्व युनिटच्या जन्माचा दाखला, शाळेचा दाखला, निवडणूक ओळखपत्र, जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी रहिवासी दाखला, ग्रामपंचायत दाखला आवश्यक आहे. पूर्वी रेशनकार्ड बनविणे नागरिकांसाठी खूपच सोपे होते. कमी कागदपत्रांमध्ये ते बनविले जात होते.

मात्र, आता विविध दाखल्यांचा आधार घेत नवीन रेशन कार्ड करावे लागत आहे. रहिवासी दाखला, ग्रामपंचायत दाखला किंवा अनेक दाखल्याची गरज असते. रेशन कार्ड सरकारने जारी केलेला एक महत्त्वाचा कायदेशीर दस्ताऐवज आहे. या दस्ताऐवजात प्रविष्ट केलेल्या माहितीच्या आधारावर धान्य वाटप केले जाते. शासकीय योजनेचा लाभघेण्यासाठीही रेशनकार्ड मध्ये दिलेल्यामाहितीचा वापर करता येते. हे कायदेशीर मान्यताप्राप्त दस्ताऐवज ओळख आणि पत्ता, पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते. परंतु, आता नवीन रेशनकार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन रेशनकार्ड बनविणे अवघड झाल्याचा नवीन कार्ड धारकाला प्रत्यय येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button