नांदेडआरोग्य

Maharashtra State Nurses Association ; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा- नांदेड यांचे आज एक दिवसीय कामबंद आंदोलन

नवीन नांदेड l सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन शाखा नांदेड यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय विष्णुपुरी येथे करण्यात आले असून या आंदोलन शंभर टक्के परिचारिका सहभागी झाल्या होत्या.
राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी २०१७ साली बक्षी सामिती गठित करण्यात आली. बक्षी समितीसमोर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेनी राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील पदाच्या मागण्या संदर्भासहित सादर केल्या.

त्यानंतर एप्रिल २०१९ ला बक्षी समितीच्या शिफारसी नुसार १जाने २०१६पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला.त्यात असलेल्या त्रुटी निवारणासाठी मार्च २०२३ मध्ये बक्षी समितीचा खंड २जाहीरकरण्यात आला होता.या खंड२मध्ये परिचारिका संवर्गाच्या वेतन त्रुटीचे निराकरण होणे अपेक्षित असताना,पुन्हा खंड २ मध्ये सुद्धा अधिपरिचारिका,परिसेविका, पाठयनिर्देशिका तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील बालरोग परिचारिकाया पदावरील अन्याय दूर झाला नाही.

समकक्ष पदांचा सुधारित वेतनश्रेणी लागू झाल्या परंतु काही पदावर अन्याय कायम राहीला. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने प्रशासकीय विभाग व शासनाच्या या बाबी लक्षात आणून दिल्या. तसेच, न्यायालयात ही दाद मागितली.विविध संघटनांच्या न्यायालयीन प्रकरणामुळे शासनाने पुन्हा वेतन त्रुटी निवारणासाठी मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली खुल्लर समिती गठित केली.

या समिती पुढे सुद्धा संघटनेच्या वतीने वेतन त्रुटी निवारणास्तव सादरीकरण करण्यात आले,परंतु पुन्हा एकदा अधिपरिचा रिका,परिसेविका,पाठयनिर्देशिका या पदावर कार्यरत परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अन्याय दूर न झाल्यामुळे परिचारिकांच्या पदरी घोर निराशा आली आहे.अधिपरिचारिका (Staff Nurse)/ परिसेविका‌ (Sis–Incharge),पदावरील कर्मचारी हे प्रत्यक्षपणे जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देतात.

कोव्हिड काळात परिचारिकांनी सण/उत्सव, मुलंबाळं, कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून रुग्णांची सेवा केली. आजही करत आहेत, तर पाठय‌ निर्देशिका पदावरील कर्मचारी परिचारिकांना शिक्षण देण्याचे कार्य करतात म्हणून पंतप्रधान यांनी परिचारिकांना फ्रंटलाईन योद्धा असे संबोधले आहे. या पदावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर न झाल्याने शासन दरबारी परिचारिका संवर्ग हा कायम दुर्लक्षित असल्याची राज्यातील परिचारिकांची धारणा झाली आहे.

यामुळे परिचारिकामध्ये संतप्त भावना निर्माण झालेल्या असतानाच, वैद्यकीय शिक्षण विभागाने दि ६ जून रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचे परिपत्रक निर्गमित केले असून त्याचा तीव्र निषेध परिचारिका संवर्गामधून केला जात आहे. सन २०२२ मध्ये शासनाने परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णय निर्गमित केला होता.त्यास राज्यभरातून कडाडून विरोध झाला होता. इतकेच नव्हे तर मे २०२२ मध्ये १० दिवस बेमुदत आंदोलन राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांनी केले होते.

त्यानंतर हा निर्णय रद्द करुन कायमस्वरूपी पदभरतीची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू केल्याचे शासनाच्या वतीने संघटनेस पत्राद्वारे कळविण्यात आले होते. राज्यात वाढत्या लोकसंख्येनुसार परिचारिकांच्या विविध स्तरावरील पदांची नियमित पदनिर्मिती, १००% कायमस्वरूपी पदभरती आणि १००% पदोन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका सातत्याने पाठपुरावा करीत असून परिचारिकांच्या या मागण्याकडे शासन स्तरावर वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात असून ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. रुग्णसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिका कायमच,केवळ उपेक्षित राहत असून, या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक वेळी परिचारिकांनाआंदोलनच करावे लागेल का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यामुळे परिचारिका मध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यास्तव अधिपरिचारिका, परिसेविका, पाठयनिर्देशिका या पदारील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करणे तसेच परिचारिकांची कंत्राटी भरती रद्द करून तात्काळ १००% कायम स्वरूपी पदभरती सुरू करण्यात यावी. पदोन्नतीने भरावयाची जवळ पास ५०% हून अधिक रिक्त पदे तात्काळ पदोन्नतीने भरण्यात यावी.

४० वर्षापासून परिचारिकांचे प्रलंबित असलेले भत्ते मंजूर करावे व इतर महत्वाच्या प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर या शासन मान्यता प्राप्त संघटनेसह राज्यातील परिचारिकासाठी काम, करणाऱ्या इतर समविचारी संघटनांना सोबत घेऊन, १५ व १६ जुलै २५ रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन व निदर्शने, १७ जुलै १ दिवसाचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन व याची दखल न घेतल्यास, १८ जुलै पासून राज्यव्यापी बेमुदत तीव्र कामबंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना .शाखा नांदेड ( विष्णुपुरी).शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी दिली.

या आंदोलनात शाखा‌ विष्णुपुरी येथील पदाधिकारी अध्यक्षा प्रतिभा वाघदरीकर ,सचिव केशव जिंकलवाड कोषाध्यक्ष रवि शिसोदे ,सल्लागार रेवता सामलवार उपाध्यक्ष सुनीता शिंदे,विलास कनसटवाड, कार्याध्यक्ष बाळासाहेब मोरे ,सहसचिव उत्तम खुडे, रामेश्वर पाळवदे,सह कोषाध्यक्षदिनेश पतंगे संघटक अर्चना मुंगल, गिरीराज परोडवाड, कार्यकारी सदस्य भालेराव बाळासाहेब ,बालिका पवार, शुभांगी कस्तुरे, छाया पांचाळ, सुषमा भोसले, विश्वाम्बर वागतकर, दिनकर हंगे पदाधिकारी वर्ग,व तसेच सर्व परिचारिका वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती होते. सदरील संपात 100% परिचारिका वर्ग सहभागी होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!