नांदेड| मराठवाडा साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच पार पडली.या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी परिषदेच्या अंतर्गत विविध समित्यांची घोषणा केली.
या समित्यांवर नांदेड येथील साहित्यिकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आलेली आहे.केंद्रिय कार्यकारिणीचे सदस्य संजीव कुलकर्णी यांच्या कडे ग्रंथ पुरस्कार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले असून डॉ.कमलाकर चव्हाण, डॉ.विश्वाधर देशमुख, सुचिता खल्लाळ, डॉ.राजेंद्र गोणारकर यांची समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.देवीदास फुलारी, संजीव कुलकर्णी, योगिता पांडे सातारकर यांची निवड प्रतिष्ठानच्या संपादक मंडळावर झाली आहे.
निर्मलकुमार सूर्यवंशी यांची ग्रंथ प्रकाशन समितीवर तर डॉ भगवान अंजनीकर, दत्ता डांगे आणि प्रा.नारायण शिंदे यांची बाल साहित्य समितीवर, निवड करण्यात आली आहे, मराठवाडा वाड् माय इतिहास समितीवर डॉ.पी.विठ्ठल यांना संधी देण्यात आली आहे.ग्रामीण शब्दकोश समितीवर वीरभद्र मिरेवाड आणि डॉ.वैजनाथ आनमुलवाड यांना घेतले आहे.मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन आणि ग्रंथालय समितीवर डॉ.हेमलता पाटील काम पाहणार आहेत.
मराठवाडा साहित्य परिषदेने नांदेडच्या साहित्यिकांना झुकते माप दिल्याने साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. (डॉ.भगवान अंजनीकर,निर्मलकुमार सूर्यवंशी आणि प्रा.नारायण शिंदे यांची विविध समित्यांवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम,अनुवादक भीमराव राऊत,अँड.सी.आर.पंडित यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले.)