श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना माफक दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, बबनराव बारसे व भुजंगराव पाटील यांनी दि २१ फेब्रु २०२५ रोजी. खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना पत्र देऊन जिल्हाधिकारी मार्फत घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी पत्र दिले होते. त्या पञाची दखल घेत खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी नांदेड यांना पत्र लिहून घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याचे पत्र दिल्याने घरकुल लाभार्थ्यातून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे यांचे अभिनंदन होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य दरात नव्हे तर घर बांधकाम करण्यासाठी वाळू मिळत नाही. त्यात आपले व जिल्हा पोलीस यांच्या माध्यमातून वाळू माफियावर कार्यवाहीचे धाड सत्र सुरू असून या कार्यवाहीला आमचे नक्कीच समर्थन राहील मात्र अधिकृत गौण खनिज भरून किंवा जप्त केलेल्या वाळूचा जिल्हा प्रशासनाने लिलाव केला. अश्या ठिकाणी विनाकारण धाडी टाकून कार्यवाही होत असल्याची तक्रार येत आहे. अशी बाब होत असेल तर निश्चितच ते योग्य होणार नाही व यामुळे गोर गरीब जनतेला घरकुल योजनेसाठी वाळू मिळत नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मुळात त्यांना योग्य दरात वाळू उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी आहे. आज मितीस ही बाब संदर्भीय पत्रांनव्ये शिवसेनेचे तिन्ही जिल्हाप्रमुख यांनी नियमाप्रमाणे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना माफक दरात वाळू देण्यासाठी विनंती केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच जिल्हा गौण खनिकर्म अधिकारी यांची एक घरकुल योजना सक्षम राबवली जाईल. या दृष्टीने आढावा बैठक घेऊन तत्सम गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी मार्फत मागणी प्रमाणे माफक दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी योग्य ते आदेश देण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिल्याने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा खराटे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे घरकुलधारकांना माफक दरात वाळू मिळण्या बद्दल अशा पल्लवीत झाल्या आहेत.



