Sand Provide ; ज्योतिबा दादा खराटेच्या पत्रावरून खा. नागेश पाटील यांचे जिल्हाधिकारी नांदेड यांना पत्र
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना माफक दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, बबनराव बारसे व भुजंगराव पाटील यांनी दि २१ फेब्रु २०२५ रोजी. खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना पत्र देऊन जिल्हाधिकारी मार्फत घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी पत्र दिले होते. त्या पञाची दखल घेत खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी नांदेड यांना पत्र लिहून घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याचे पत्र दिल्याने घरकुल लाभार्थ्यातून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे यांचे अभिनंदन होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य दरात नव्हे तर घर बांधकाम करण्यासाठी वाळू मिळत नाही. त्यात आपले व जिल्हा पोलीस यांच्या माध्यमातून वाळू माफियाव...
