हिमायतनगर| येथील नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर येथील एका युवकाने चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात कुणाल राठोड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णलयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर हिमायतनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हिमायतनगर येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड हे नेहमीप्रमाणे आपल्या मित्रासह श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या ओट्यावर दिनांक ०२ जुलै रात्री ११ वाजेच्या सुमारास बसून चर्चा करत होते. दरम्यान सोबतच काही मित्र गेले व एक मित्र लघवीसाठी बाजूला गेला होता. ही संधी साधून मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या राठोड यांच्यावर भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी याने चाकू हल्ला केला आहे.
हा प्रकार लक्षात येताच राठोड यांच्या सोबतच्या मित्राने धावत येऊन असे का..? करतोस म्हणून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र रागात असलेल्या युवकाने कुणाल राठोड यांच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी दोघांची झटापट झाली आणि दोघेही जखमी झाले असल्याचे सांगितले जात असून, दोघांवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेत कुणाल राठोड यांच्या मांडीवर चाकू लागून ते गंभीर जखमी झाले असुन, त्यांच्यावर हिमायतनगर येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार करण्यात आला आहे. रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले असून, नांदेड येथे उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर राम सूर्यवंशी हे देखील गंभीर जखमी झाले असून, माझ्यावर कुुुणाल राठोड यांनी हल्ला केल्याने मी जखमी झालो. माझ्यावर नांदेडला रेणूकाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे असे त्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. दरम्यान चाकू हल्ला करण्याचे नेमके कारण काय…? होते याबाबत पोलिसांनी सध्यातरी काहीच सांगितले नाही. मात्र व्यक्तिष्य एकमेकांची बदनामी केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला की..? राजकिय वैमानस्यातून हे अजूनही अस्पष्ट आहे. या घटनेमुळे शहरात विविध प्रकारच्या चर्च्या होऊ लागल्या आहेत.