CRIME NEWS – हिमायतनगरचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर चाकू हल्ला; गंभीर जखमीवर नांदेड येथे उपचार सुरु – NNL
हिमायतनगर| येथील नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर येथील एका युवकाने चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात कुणाल राठोड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णलयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर हिमायतनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हिमायतनगर येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड हे नेहमीप्रमाणे आपल्या मित्रासह श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या ओट्यावर दिनांक ०२ जुलै रात्री ११ वाजेच्या सुमारास बसून चर्चा करत होते. दरम्यान सोबतच काही मित्र गेले व एक मित्र लघवीसाठी बाजूला गेला होता. ही संधी साधून मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या राठोड यांच्यावर भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी याने चाकू हल्ला केला आहे.
हा प्रकार लक्षात येताच राठोड यांच्या सोबतच्या मित्राने धावत येऊन अ...
