Homeनांदेडlife certificate : डिजिटल क्रांतीमुळे ज्येष्ठ, विधवा व दिव्यांगांना घरबसल्या ‘जीवन प्रमाणपत्र’...

life certificate : डिजिटल क्रांतीमुळे ज्येष्ठ, विधवा व दिव्यांगांना घरबसल्या ‘जीवन प्रमाणपत्र’ सुविधा

नांदेड| विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधेची सुरुवात करून प्रशासनाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींना दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.

आता बेनिफिशियरी सत्यापन अॅप आणि आधार फेस आरडी अॅपच्या मदतीने लाभार्थी आपल्या स्मार्टफोनवरून अवघ्या काही मिनिटांत ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करू शकतात. ही सुविधा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना यासाठी लागू आहे. या योजनांचा लाभ सातत्याने मिळण्यासाठी दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या नवीन डिजिटल सुविधेमुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद झाली आहे.

फायदे : घरबसल्या सुविधा – मोबाईलवरून प्रमाणपत्र सादर.
वेळेची बचत – काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण.
सुरक्षित व पारदर्शक – आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन.
ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी सोय – प्रवासाचा त्रास टळणार.

प्रक्रिया सोपी असून लाभार्थ्यांनी प्ले स्टोअर/अॅप स्टोअरवरून दोन्ही अॅप्स मोफत डाउनलोड करावेत.आधार क्रमांक नोंदवून चेहरा स्कॅन करावा आणि यशस्वी सत्यापनानंतर डिजिटल प्रमाणपत्र आपोआप विभागाकडे पाठवले जाईल. लाभार्थ्यांनी ही सुविधा त्वरित वापरून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संगायो तहसीलदार प्रगती चोंडेकर यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments