कंधार | कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत कंधार पोलिसांनी आरोपीस अटक करून तब्बल २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात चोरीच्या घटनांवर आळा बसणार असल्याचे चित्र आहे.

या प्रकरणी पोलीस ठाणे कंधार येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६, भा.दं.वि. कलम ३०३, २(३), ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गोविंद चंद्रकांत चांदे (वय २३, व्यवसाय – चालक, रा. ओमकार कॉलनी, कंधार, जि. नांदेड) असे आहे.

दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी रात्री ७.०० ते २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.०० या कालावधीत कंधार तालुक्यातील एका ठिकाणी इलेक्ट्रिक ट्रॉली व सेंट्रींग साहित्याची चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर कंधार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीस ताब्यात घेतले.


आरोपीकडून इलेक्ट्रिक ट्रॉली – ₹१,००,०००, सेंट्रींग प्लेट्स – ₹४०,०००, इतर साहित्य – ₹१,४०,०००, असा एकूण ₹२,८०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अविनाश कुमार (IPS) अपर पोलीस अधीक्षक नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार डॉ. अश्विनी जनार्दन यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. कंधार पोलिसांनी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. पुढील तपास कंधार पोलीस करीत आहेत.

