Friday, May 15

Tag: Property worth Rs 2.80 lakh seized

Kandahar police : कंधार पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून २.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kandahar police : कंधार पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून २.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
कंधार | कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत कंधार पोलिसांनी आरोपीस अटक करून तब्बल २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात चोरीच्या घटनांवर आळा बसणार असल्याचे चित्र आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे कंधार येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६, भा.दं.वि. कलम ३०३, २(३), ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गोविंद चंद्रकांत चांदे (वय २३, व्यवसाय – चालक, रा. ओमकार कॉलनी, कंधार, जि. नांदेड) असे आहे. दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी रात्री ७.०० ते २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.०० या कालावधीत कंधार तालुक्यातील एका ठिकाणी इलेक्ट्रिक ट्रॉली व सेंट्रींग साहित्याची चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर कंधार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीकडून इल...
error: Content is protected !!