नवीन नांदेड l नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या झरी खदान येथे श्री गणेश विसर्जन अनुषंगाने पोलीस, महसूल बांधकाम,मनपा विभागाच्या अधिकाऱ्यांनी 3 सप्टेंबर रोजी संयुक्त पाहणी करून आवश्यक त्या सुचना केल्या आहेत .


गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड शहरातील व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या श्री गणेश मुर्ती गोदावरी पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी नदी पात्रात टाकण्या ऐवजी
झरी खदान येथे टाकण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने 3 सप्टेंबर रोजी सकाळी झरी खदान येथे पाहणी करून या ठिकाणी बॅरिकेड्स सह,क्रेनव्दारे श्री मुर्ती विसर्जन यासह ,विघुत व्यवस्था,रस्ते,पोलीस सुरक्षा ,जिवरक्षक दल यासह आवश्यक त्या सुविधा व सुचना देण्यात आला असून यावेळी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाचे शहर पोलिस विभागीय अधिकारी वैजाणे ,ईतवारा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे,वजीराबाद पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम,ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, महसूल प्रशासनाचे डॉ.सचिन खल्लाळ, नांदेड तहसीलदार संजय वारकड,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरमिनवार,मनपाचे सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा बेग,रमेश चावरे,अभियंता सुमंत पाटील शहर अभियंता,कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर व कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी, मंडळ अधिकारी जौधंळे यांच्या सह विवीध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


यावेळी संयुक्त पाहणी करून तात्काळ संबंधीत ठिकाणी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची चर्चा केली.मनपाचा वतीने 11क्रेन व्दारे श्री गणेश विसर्जन मुर्ती करण्यात येणार असुन संबंधीत ठिकाणी मुरूम गिटटी टाकण्यात येणार असुन रोडवरील अनेक भागात विघुत व्यवस्था व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. नांव घाट येथे श्री विसर्जन पाहणी स्थळ व पर्यावरण पुरक तलाव प्रगती पथावरील कामाची पाहणी यावेळी करण्यात आली.




