HomeनांदेडTehsildar Pallavi Temkar : शासनाच्या मोफत रेती योजनेतून हिमायतनगर तालुक्यातील घरकुल धारकांना...

Tehsildar Pallavi Temkar : शासनाच्या मोफत रेती योजनेतून हिमायतनगर तालुक्यातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध – तहसीलदार पल्लवी टेमकर

हिमायतनगर,अनिल मादसवार। तालुक्यातील अवैध रेतीसाठे जप्त करून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या मोफत वाळू योजनेतून उपलब्ध करून देण्याला सुरुवात झाली आहे. याचा शुभारंभ हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथून करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेल्या घरकुओ धारकांना यादीनुसार पहिल्या दिवशी सरसम, खडकी बा. येथील लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे. नदी नाल्याच्या शासकीय खदानीवरून विनापरवाना कोणीही अवैधरित्या रेती व मुरमाचे उत्खनन करत असेल तर त्याची गैर केली जाणार नाही असा इशाराही तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

499653007 3723691054441676 8150910389771733551 n Tehsildar Pallavi Temkar : शासनाच्या मोफत रेती योजनेतून हिमायतनगर तालुक्यातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध - तहसीलदार पल्लवी टेमकर

महाराष्ट्र शासनाने गरिब घरकूल लाभधारकाला मोफत वाळू देण्यात येईल असे जाहिर केले होते. मात्र अद्यापपर्यंत हिमायतनगर तालुक्यातील एकाही रेतीघाटावरून अथवा जप्त करण्यात आलेल्या रेती साठ्यातून, वाळू घाटवरून घरकुल धारकांना रेती उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे रेतीघाटचे लिलाव झालेले नसताना तालुक्यातील मौजे विरसणी, कामारी, जवळगाव, पिंपरी, डोल्हारी, धानोरा, पळसपूर, वारंगटाकळी, मंगरूळ, हिमायतनगर, घारापुर, खडकी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विना परवाना अवैधरित्या हजारो ब्रास वाळूचे उत्खनन राजकीय वरदहस्त असलेल्या रेती माफियांनी करून अवैद्य साठे केले आहेत. आणि गरजूना अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. त्यामुळे घरकुल धारकांच्या घरकुलाचे स्वप्न अधांतरी राहिले असून, व्याधी दिडी करून मनमानी दराने वाळू विकत घेऊन माफियांचे घरे भरावी लागत आहेत.

IMG 20250527 WA0071 Tehsildar Pallavi Temkar : शासनाच्या मोफत रेती योजनेतून हिमायतनगर तालुक्यातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध - तहसीलदार पल्लवी टेमकर

त्यामुळे गरिब घरकुल लाभार्थ्यां नागरीकांची यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असून, असे असताना संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी हे वाळूमाफियांशी हात मिळवणी करुन त्यांची पाठराखन करत आहेत. हा प्रकार लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते गजानन जिदेवार यांच्यासह अनेकांनी हिमायतनगर तहसिलदार मॅडम यांना निवेदन देऊन कामारी, विरसणी, जवळगाव, पिंपरी ठिकाणी जो वाळू साठा करण्यात आला आहे. तो वाळूसाठा शासनाच्या ताब्यात घेऊन गरिब घरकुल धारकास मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता.

500030336 3723691434441638 2607005873176977326 n Tehsildar Pallavi Temkar : शासनाच्या मोफत रेती योजनेतून हिमायतनगर तालुक्यातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध - तहसीलदार पल्लवी टेमकर

या निवेदनाची दाखल घेत तात्काळ मंडळ अधिकारी व तलाठी यांना अवैद्य वाळूसाठे जप्त करण्याचे आदेश तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी देऊन शासनाच्या अद्ययावत निर्णयानुसार रेती घाट तसेच जप्त करण्यात आलेल्या वाळू साठ्यातून घरकुल धारकांना रेती उपलब्ध करुन दिली आहे. दिनांक २७ मंगळवारी पहिल्या दिवशी तालुक्यातील सरसम, खडकी बा आदी ठिकाणी स्वतः उपस्थित होऊन लाभार्थीना रेतीची परवानगी देऊन मोफत रेती योज़नेच्या नियमाची अंमलबजावणी केली आहे. घरकुल धारकांना शासनाच्या नियमानुसार रेती उपलब्ध करून दिल्याने लाभार्थ्यांनी आभार मानले असून, तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या रेती घाटाजवळ रेतीमाफियांनी केलेल्या साठ्याची जप्ती करून घरकुल धारकांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी घरकुल धारक नागरीकातून केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments