Homeनांदेडbus accident : नांदेडमध्ये भीषण बस अपघात – 28 प्रवासी जखमी, 4...

bus accident : नांदेडमध्ये भीषण बस अपघात – 28 प्रवासी जखमी, 4 गंभीर

देगलूर/नांदेड| चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे देगलूर आगाराची औरादकडे जाणारी बस रस्त्याखालच्या दरीत गेल्याने 28 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 4 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी देगलूर तालुक्यातील गवंडगाव-बल्लूर मार्गावर झाला.

सततच्या मुसळधार पावसामुळे या भागात रस्ते व पूल धोकादायक झाले आहेत. मौजे लोणी येथील निजामकालीन फुलाच्या गाळ्याची भिंत कोसळल्याने देगलूर-औराद मुख्य मार्ग मागील सहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे देगलूर आगाराच्या बस सेवा मागील तीन दिवसांपासून गवंडगाव–माळेगाव–हनेगाव–औराद या पर्यायी अरुंद मार्गावरून सुरू होत्या.

IMG 20250903 WA0100 bus accident : नांदेडमध्ये भीषण बस अपघात – 28 प्रवासी जखमी, 4 गंभीर

मुख्य मुद्दे :
अपघातात 28 प्रवासी जखमी
4 प्रवाशांची प्रकृती गंभीर
बस अरुंद व चिखलमय मार्गावरून जात असताना नियंत्रण सुटले
जखमींवर देगलूर व नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू
प्रशासनाने या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments