नांदेडकरियर

Jagar program : नवभारत साक्षरता अभियान योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न -NNL

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता योजनांचा जागर कार्यक्रम अभियानांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे व शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत माहूरच्या बसस्थानकासह नवरात्र उत्सवातील नियंत्रण कक्ष टी पॉईंट आणि श्री रेणुका माता संस्थान येथे गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया नवभारत साक्षरता योजनांचा जागर कार्यक्रम अभियानाचे माहूर तालुका समन्वयक संतोष चव्हाण यांचेसह केंद्रप्रमुख शिक्षक कर्मचाऱ्यांनी भिंतीपत्रक वाटून जनजागरण केले.

जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत माहूर तालुका शिक्षण विभागाकडून केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता योजनांचा जागर कार्यक्रम अंतर्गत २१ प्रकारचे कार्यक्रम राबविले जात असून या नवभारत साक्षरता योजनांचा जागर अभियानाच्या मूळ उद्देशा पैकी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान महत्वपूर्ण जीवन कौशल्य कुटुंब कल्याण, आर्थिक साक्षरता कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, बाल संगोपन आणि शिक्षण कुटुंब कल्याण तसेच व्यवसाय कौशल्य विकास मूलभूत शिक्षण स्थानिक रोजगार पून कुशलता आणि उच्च कौशल्य तसेच मूलभूत शिक्षण कला विज्ञान तंत्रज्ञान संस्कृती क्रीडा इत्यादी असून कार्यक्रमाची वैशिष्ट्ये एनसीसी व एन एस एस आणि एन वाय के एस तसेच विद्यार्थी पोर्टलचा वापर सर्वांसाठी शिक्षण शाळा एकक असाक्षर व स्वयंसेवक यांचे सर्वेक्षण करणे असून यासाठीही माहूरचे गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया हे जनजागरण करत आहेत.

आलेल्या हजारो भाविकांना गडावरील श्री रेणुका माता संस्थान नियंत्रण कक्ष आणि बस स्थानकात गटशिक्षणाधिकारी कृष्णा भरडिया यांचे सह नवभारत साक्षरता योजनांचा जागर अभियानाचे माहूर तालुका समन्वयक संतोष मोहन चव्हाण उपगशि मुधोळकर, वि.अ. संजय खडकेकर, केंद्रप्रमुख एन बी राठोड, एस एस पाटील, पोपुलवार सर ,कानडे सर, सुरोशे सर, येरमे सर, रणजीत वर्मा, वांगे सर, अजय राठोड ,सुरज आडे, मार्कंड सर, पळसकर सर यांचेसह सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!