नांदेड| नांदेड आणि बीडसह इतर जिल्ह्यात घरफोडी करून चोरी केलेले साहित्या विक्री करीता नांदेमध्ये आलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकुण 2,41,500/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


जिल्हयातील व परजिल्ह्यातील घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फलश आऊट अंतर्गत उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.नांदेड यांना आदेशीत केले होते. वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा येथील महेश कोरे पोलीस उप निरीक्षक, नागनाथ तुकडे पोलीस उप निरीक्षक व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी दिनांक 13 जुलै 2025 रोजी दुधडेअरी चौक नांदेड परिसरात आले होते.


यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, धनेगाव चौकात ब्रिजचे खाली रोडवर पिवळया व हिरव्या रंगाचे दोन अॅटोमध्ये चोरी केलेले साहित्या विक्री करीता आलेले आहे. यावरुन पोलीस पथकाने छापा टाकला असता तेथे मुस्तफा कासीम पठाण वय 27 वर्ष, रा. आंबेडकर चौक, पानगाव जिल्हा लातुर आणि शेख ईरफान शेख मुनिर ऊर्फ मुन्ना वय 21 वर्ष, रा.आंबेडकर चौक, पानगाव जिल्हा लातुर हे आढळून आले. त्यांच्या ताब्यात विमानतळ पोलीस ठाणे परिसरातील घरफोडी व चो-या, पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथील 01 चोरी, पो.स्टे. रेणापुर जिल्हा लातुर येथील 01 चोरी, पो.स्टे. परळी ग्रा.जि.बीड येथील (01 चोरी अशा घरफोडी व चोरीच्या गुन्हयातील मुद्देमाल आढळून आला.


त्यामध्ये 01) एक पॅजीओ अॅपे कंपनीचा पिवळया रंगाचा अॅटो क्र. MH 02-CE-4580 किमती 50,000/-रू 02) वेल्डींग सेट, पाना सेट, हातोडा, ग्रॅन्डर मशिन, बॅटरी वायर, भंगार तांबे पितळ एकुण 46,500/-रू 03) सेंन्टीगच्या प्लेट एकूण 27,000/-रू 04) पॅजीओ कंपनिचा अॅपे अॅटो MH 26 BD 2066 किमती 62,000/-रू. (05) नगदी 6000/- रू 06) एक जनरेटर, लोखंडी स्टॅन्ड व 04 डिस्कसह टायर एकुण किंमती 40,000/-रू 07) मळणी यंत्र (हालर) याचे इंजिन किमती 10,000/-रुपये असा एकूण 2,41,500 /- रूपयाचा मुद्देमाल आरोपीतांच्या ताब्यात मिळुन आला. त्यावरून सदर आरोपीतांना विचारपुस केली असता त्यांनी वरील गुन्हे केल्याची कबुली दिल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करून मुद्देमालासह आरोपींतांना पोलीस स्टेशन विमानतळ, नांदेड येथे पुढील कायदेशीर कार्यवाही कामी ताब्यात देण्यात आले आहे.



