HomeनांदेडTwenty-Twenty : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! बिस्किटांतून जिवंत अळ्या – परिसरात खळबळ

Twenty-Twenty : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! बिस्किटांतून जिवंत अळ्या – परिसरात खळबळ

हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरात आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक किराणा दुकानातून खरेदी केलेल्या ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ बिस्किटांच्या पुड्यात जिवंत अळ्या आढळल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

रमेश पंडित यांचे लहान मूल हे बिस्किट खाल्ल्यानंतर काही वेळातच उलट्या व तीव्र मळमळ होऊ लागल्याने त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर उर्वरित बिस्किट पुडा उघडून पाहिला असता त्यामध्ये जिवंत अळ्या रेंगाळताना दिसल्या. विशेष म्हणजे, या बिस्किटाच्या पुड्यावर नोव्हेंबर २०२५ पर्यंतची एक्सपायरी डेट स्पष्टपणे नमूद आहे.

या घटनेबाबत पंडित कुटुंबियांनी तहसीलदारांमार्फत अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच नांदेड अन्नसुरक्षा विभागाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. संबंधित कंपनी व स्थानिक एजन्सी चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या निष्काळजी कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकारामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींना वेळीच धडा शिकवणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments