Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ
  • Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा
  • Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले
  • Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या
  • Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
  • Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव
  • Mahavitaran : हिमायतनगरमध्ये महावितरणचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - लेख - The wounds of the flood and the tears of the river! महापूराच्या जखमा अन् नदीचे अश्रू!
लेख नांदेड September 30, 2025

The wounds of the flood and the tears of the river! महापूराच्या जखमा अन् नदीचे अश्रू!

NNL TeamBy NNL TeamSeptember 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

पैसा नको, संपत्ती नको
अंग झाकण्याएवढे कपडे द्या
पाटी नको, दप्तर नको
पोटाला लागेल तेवढी भाकरी द्या
नको मदत मुख्यमंत्री साहेबांची
साहेब जीव वाचवून द्या
साहेब जीव वाचवून द्या…
न्यूज चॅनलवर एका 7 ते 8 वर्षाच्या चिमुकलीची मुलाखत बघितली अन् मन सुन्न झालं. त्या चिमुकीने अश्रू गाळत, हुंदके देत साहेब जीव वाचवून द्या… हेच तिचे वाक्य… ऐकताना मुलाखत घेणार्‍यालाही अश्रू अनावर झाले. त्याचेही मन भरुन आले. त्या चिमुकलीची कशी समजुत काढावी हेही त्याला समजत नव्हतं.

सुंदर गाव, बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा मंजुळ आवाज, शेणामातीनं सारवलेल्या भींती व अंगण, ढाळजात बसलेले आजी- आजोबा, बैलांना घेऊन निघालेले शेतकरी, शेतात स्वतःच्याच तोर्‍यात डोलणारे पीक, कामात व्यस्त असणारी आमची माय- बहीण, शाळेच्या तयारीत असणारे आमचे लाडके चिमुकले अशी दिनचर्या सुरु असताना रात्रीतून अश्रूमय करणारी विदारक परिस्थिती. सकाळी होत्याचं नव्हतं करणारे जलमय चित्र. कुणाच्या शेळ्या- कोंबड्या, कुणाचे जनावरं, कुणाचे धान्य, घर- संसार आमच्याच माय नावाच्या नदीने वाहून नेले. कुणाचे वडील, आजी, आजोबा, बहीण, भाऊ असे अनेक लोक बेपत्ता झाले. कोणती बातमी कधी कानावर येईल या भीतीने अंगावर शहारे आणणारी परिस्थिती निर्माण झाली.

सगळीकडे पाणीच पाणी. महापूर, नदीचे रौद्ररुप यातील पाणी सार्‍या दुनियेला दिसते, पण महापूरात उद्धवस्त झालेल्या लोकांच्या वेदना, डोळ्यातील अश्रू कदाचित त्या नदीबरोबरच वाहून जात असावेत. कारण नदीप्रमाणेच त्या अश्रूंनीही रौद्ररुप धारण केले असावे.
नदी मायचा महिमा गाताना एका कवितेच्या काही ओळी आठवतात –
नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येणे भूमीवर
नदीबाई माय माझी निळे निळे पाणी
मंद लहरीत गाते ममतेची गाणी…
रोज नदीवरुन जाताना याच नदीमायला हात जोडून नतमस्तक होणारे डोके याच मायला प्रश्न विचारतात, का कोपसील माय तुझ्या लेकरांवर? डोळ्यात जोपासणार्‍या स्वप्नांची रांगोळी विस्कळीत करणारी नदीमाय सुद्धा निरुत्तर होऊन अश्रू ढाळत ढाळत पुढे जात असावी.

आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन स्वतःच्या संसाराला फुलवणारे गरीब शेतकरी शासनाच्या सहकार्याने किती उभे राहतील? वीट- माती यांच्या सहाय्याने स्वतःच्या रक्ताचं पाणी करुन घर उभं करणार्‍या शेतकर्‍यांसाठी आभाळ फाटलं, स्वप्नं विरलं, संकटांनी घेरलं, पावसामुळे अश्रू आणि दुःखाचा महापूर आला. बळीराजाचा आक्रोश सरकारपर्यंत कधी पोहोचणार? यांच्या डोळ्यातील अश्रू आटेपर्यंत सरकारलाही जाग येणार नाही की नाही, माहिती नाही. पण या बळीराजाला मदत करणं सरकारच्याही फायद्याची गोष्ट नाही. सगळा मेवा, मलाई खाल्ल्यानंतर पातेल्याच्या तळाशी राहिलेलं करपलेलं जरी पोहोचलं तरी माझा शेतकरी राजा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. कारण असे अस्मानी संकट तो अगदी बालवयापासूनच पाहत त्याचे चटके सहन करत लहानाचा मोठा झाला.

या महापूराच्या जखमांनी तो कोलमडून जरी पडला असला तरी तेवढ्याच नव्या उमेदीनं तो उभं राहण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण त्याच्या असतातच अगदी तोलामोलाच्या शेणामातीने सारवलेल्या भिंती, संसारोपयोगी साहित्य आणि शेतीसाठी लागणारी अवजारे, एवढच त्याचं जग. ना गेल्याची तमा ना मिळाल्याने अभिमानानं जगणारा. अगदी कमी पैशात तोडक्या मोडक्या सोयी सुविधेत जीवनाचा खरा आनंद तोच घेऊ शकतो आणि समाधानाची झोप अगदी तप्त उन्हाळ्यातही झाडाखाली किंवा डोक्यावर पंखा नसतानाही तोच घेऊ शकतो. काय त्याचे ऐश्वर्य? काय त्याच्या मनाचा मोठेपणा? काय त्याची जीवन जगण्याची पद्धत? हेवा वाटावा असंच…

बळीराजाचा आक्रोश सरकारपर्यंत केंव्हा पोहोचणार याची निश्चित वेळ सांगता येणार नाही. पण याच बळीराजाच्या घामानं, कष्टानं पिकविणार्‍या अन्नावर आमचा देश चालतो, आम्ही पोटभर खाऊ शकतो. किमान त्या अन्नविधात्याची सरकारला कीव यावी. महापूर आला अन् सगळं घेऊन गेला.

माझी सरकारला एकच विनंती आहे की, साहेब आपले मोठमोठे अरबो रुपयांचे प्रकल्प सध्यातरी बंद करावेत अन् माझ्या गोरगरीब लोकांना, शेतकर्‍यांना जगण्याची ताकद द्यावी. अहो, देश खूप प्रगती करेल, तुमच्या या महाप्रकल्पाने! पण या प्रगतीचा उपयोग व आनंद घ्यायला ही गोरगरीब जनता व विद्यार्थी तर असावयास हवेत ना? आधी देशातील लोकं मजबूत असतील तरच होणार्‍या प्रगतीचा लाभ होईल अन्यथा या प्रगतीचा काय उपयोग?

एखाद्याच्या शेतात गांजा उगवतो तेंव्हा काही क्षणातच शासन त्या जागेवर पोहोचते, मग आता याच शासनाला महापूराच्या जखमा व अश्रूंचा डोंगर दिसत नसावा काय?
आस्मान नावाचा बाप आमचा
कोपला असा लेकरांवर
धरत्री नावाची आई आमची
रुसली का तिच्या बळांवर?
आई आई म्हणत जीव झाला कोरडा
रडत होता बाप, झाला वेडापिसा
पीक गेलं, घर गेलं, गेले वाहून स्वप्नं
पाहून हाल लेकरांचे आईही झाली सुन्नं
बाबा असू दे तुझी छाया
अन् माझ्या आईचीही माया
म्हणेल चिमुकली पुन्हा नाहीतर
साहेब जीव वाचवून द्या…
साहेब जीव वाचवून द्या…

– रुपाली रमेश बिसने, सहशिक्षिका, जि.प. हायस्कूल वजीरगाव जि. नांदेड मो. 9403957856

and the tears of the river! The wounds of the flood
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTwenty-Twenty : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! बिस्किटांतून जिवंत अळ्या – परिसरात खळबळ
Next Article Ashokrao Chavan : शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही; अशोकराव चव्हाणांचा नांदेड दौरा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

farmers in Bhisi Kolhari ; भिसी कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – NNL

October 3, 2024

Yash Kharate ; नूकसान ग्रस्त शेतकर्‍यांना व मयत शेतकर्‍याला सरसकट मदत द्या – अॅड.यश खराटे – NNL

September 3, 2024

A case under POCSO was registered : सिरंजनीत एका गावगुंडावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी गजाआड

March 6, 2025

Nominations himaytnagar : नामनिर्देशन छाननीनंतर हिमायतनगर नगराध्यक्ष पदासाठी १२ तर नगरसेवकपदासाठी 102 उमेदवार रिंगणात

November 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Police Friend Trophy : कुंडलवाडीत तालुकास्तरीय पोलीस मित्र करंडक निबंध स्पर्धा -NNL

Annimal helth chekup ; काटकळंबा येथे पशुधन पंधरवडानिमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न -NNL

Best Vishnupuri School of Priyapurak School : पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा; रिप बेनिफिट संस्थेचे प्रतिपादन – NNL

District Industries Center Policies of Government regarding MSME Sector | जिल्हा उद्योग केंद्राची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात सरकारची धोरणे-उपक्रमाबाबत सोमवारी कार्यशाळा -NNL

Misleading drunkards by running boards : शॉपी च्या नावाने बोर्ड लाऊन मद्यपींची दिशाभूल; राज्य उत्पादन शुल्क गांधारी च्या भुमिकेत -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?