Saturday, May 30

Tag: Larvae found in ‘Twenty-Twenty’ biscuits

Twenty-Twenty : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! बिस्किटांतून जिवंत अळ्या – परिसरात खळबळ

Twenty-Twenty : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! बिस्किटांतून जिवंत अळ्या – परिसरात खळबळ

नांदेड, आरोग्य
हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरात आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक किराणा दुकानातून खरेदी केलेल्या ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ बिस्किटांच्या पुड्यात जिवंत अळ्या आढळल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. रमेश पंडित यांचे लहान मूल हे बिस्किट खाल्ल्यानंतर काही वेळातच उलट्या व तीव्र मळमळ होऊ लागल्याने त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर उर्वरित बिस्किट पुडा उघडून पाहिला असता त्यामध्ये जिवंत अळ्या रेंगाळताना दिसल्या. विशेष म्हणजे, या बिस्किटाच्या पुड्यावर नोव्हेंबर २०२५ पर्यंतची एक्सपायरी डेट स्पष्टपणे नमूद आहे. या घटनेबाबत पंडित कुटुंबियांनी तहसीलदारांमार्फत अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच नांदेड अन्नसुरक्षा विभागाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. संबंधित कंपनी व स्थानिक एजन्सी चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ...
error: Content is protected !!