local crime branch : घरफोडी व चोऱ्या करणारी अंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात
नांदेड| नांदेड आणि बीडसह इतर जिल्ह्यात घरफोडी करून चोरी केलेले साहित्या विक्री करीता नांदेमध्ये आलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकुण 2,41,500/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हयातील व परजिल्ह्यातील घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फलश आऊट अंतर्गत उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.नांदेड यांना आदेशीत केले होते. वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा येथील महेश कोरे पोलीस उप निरीक्षक, नागनाथ तुकडे पोलीस उप निरीक्षक व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी दिनांक 13 जुलै 2025 रोजी दुधडेअरी चौक नांदेड परिसरात आले होते.
यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, धनेगाव चौकात ब्रिजचे खाली रोडवर पिवळया व हिरव्या रंगाचे दोन अॅटोमध्ये चोरी केलेले साहित्या विक्री करीता आलेले आहे. ...
