Friday, June 26

Tag: Inter-district gang involved

house burglary : नांदेडमध्ये घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जाळ्यात; 7.28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

house burglary : नांदेडमध्ये घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जाळ्यात; 7.28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाहीत घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी मंगल ज्ञानेश्वर चव्हाण (26, रा. गौतमनगर सांगवी), श्रीनिवास शिवाजी चव्हाण (20, रा. सोनारी, ता. हिमायतनगर) आणि प्रताप गब्बरसिंग राठोड (20, रा. सोनारी, ता. हिमायतनगर) या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तपासात आरोपींकडून सोनं व चांदीचे दागिने तसेच एकूण 7,28,339 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी नांदेड जिल्ह्यातील जामगा शिवनी, कोलंबी, इकळीमोर, नायगाव, कुंडलवाडी, बारड, लिंबगाव आणि देगलूर या भागातील घरफोडी केले असल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई “फलश आउट” ऑपरेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. सदर कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक नांदेड, अविनाश कुमार यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे कौतुक केले आहे....
local crime branch : घरफोडी व चोऱ्या करणारी अंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

local crime branch : घरफोडी व चोऱ्या करणारी अंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड आणि बीडसह इतर जिल्ह्यात घरफोडी करून चोरी केलेले साहित्या विक्री करीता नांदेमध्ये आलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकुण 2,41,500/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हयातील व परजिल्ह्यातील घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फलश आऊट अंतर्गत उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.नांदेड यांना आदेशीत केले होते. वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा येथील महेश कोरे पोलीस उप निरीक्षक, नागनाथ तुकडे पोलीस उप निरीक्षक व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी दिनांक 13 जुलै 2025 रोजी दुधडेअरी चौक नांदेड परिसरात आले होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, धनेगाव चौकात ब्रिजचे खाली रोडवर पिवळया व हिरव्या रंगाचे दोन अॅटोमध्ये चोरी केलेले साहित्या विक्री करीता आलेले आहे. ...
error: Content is protected !!