कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 17 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 22,85000/- रु चे जनावरे व वाहन जप्त -NNL

नांदेड। कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 17 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 22 लक्ष 85 हजार रुपयाचे जनावरे व वाहन भाग्यनागर पोलिसांनी जप्त केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबीनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुशंगाने पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड अंतर्गत दि.04/09/2024 रोजी पो.स्टे. भाग्यनगर नांदेड चे गुन्हे शोध पथकाचे पो. उपनि केजगीर यांना गुप्त बातमीदार यांचे कडुन माहीती मिळालो की पुर्णाकडुन नांदेडकडे रोडने एका आयशर वाहनात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे नेत आहेत अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती वरीष्ठाना देवुन सोबत अमंलदार पो.हे. कॉ.2150 माळवे, पो.कॉ.932 पठान यांना घेवुन पूर्णा ते नांदेड येणारे रोडवर जय भवानी चौकाजवळ सापळा रचुन रात्री 01.45 वाजताचे सुमारास आयशर गाडी क्रं MH-28-BB-4944 थांबवुन आत पाहणी केली.

सदर ट्रक मध्ये गोवंशीय जातीचे बैल एकुण 17 जनावरे दिसुन आली त्यावरुन आरोपी क्रं.०। गाडीचालक नामे शेख अय्युब शेख युसुफ रा. चौपाल मोहल्ला नशीराबाद ता.जि. जळगाव 02. गाडीचा हेल्पर नामे फरीद नबी कुरेशी रा.वाघारी ता. जामनेर जि. जळगाव 03. गाडीचा हेल्पर नामे शेख मुक्तार शेख अब्बास रा. आयशानगर 65 मालेगाव ता.जि.नाशोक. 04. बेलमालक शेख असलम शेख फकीरा रा.पाचोरा ता. पाचोरा जि. जळगाव असे नमुद चार आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन भाग्यनगर नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असुन सदर गोवंशीय जनावरे 17 बैल किं. अं.5.85.000 रु व आयशर गाडी क्रं. M11-28-BB-4944 किं. अ. 17,00,000/- रु असा एकूण 22.85.000/-रु.चा मुद्देमाल जप्त करुन सदर गोवंशीय जातीचे 17 वैल हे त्यांचे जिवीताचे काळजीचे उद्देशाने गोशाळा येथे पुढील पालन पोषणाकरीता दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कामगीरी ही अविनाश कुमार पोलिस अधिक्षक नांदेड, सुरज गुरब अप्पर पोलिस अधिक्षक नांदेड,  खंडेराव धरने अप्पर पोलिस अधिक्षक भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली रामदास शेंडगे पोलिस निरीक्षक भाग्यनगर, गुन्हे शोध पथक पो. स्टे भाग्यनगर चे पो. उपनि के.वि. केजगीर पो. हे.कॉ 2150 विशाल माळवे, पो.कॉ.932 /अदनान पठान यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलिस अधिक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button