कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 17 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 22,85000/- रु चे जनावरे व वाहन जप्त -NNL
नांदेड। कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 17 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 22 लक्ष 85 हजार रुपयाचे जनावरे व वाहन भाग्यनागर पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबीनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुशंगाने पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड अंतर्गत दि.04/09/2024 रोजी पो.स्टे. भाग्यनगर नांदेड चे गुन्हे शोध पथकाचे पो. उपनि केजगीर यांना गुप्त बातमीदार यांचे कडुन माहीती मिळालो की पुर्णाकडुन नांदेडकडे रोडने एका आयशर वाहनात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे नेत आहेत अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती वरीष्ठाना देवुन सोबत अमंलदार पो.हे. कॉ.2150 माळवे, पो.कॉ.932 पठान यांना घेवुन पूर्णा ते नांदेड येणारे रोडवर जय भवानी चौकाजवळ सापळा रचुन रात्री 01.45 वाजताचे सुमारास ...
