किनवट, परमेश्वर पेशवे| प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता किनवट आगाराकडून नांदेड साठी बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.सकाळी नांदेड मार्गे लातूर पर्यंत व परत सायंकाळी नांदेड वरुन किनवट पर्यंत अशा प्रकारची वाढ करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,किनवट हा आदिवासी बहुल तालुका असून जिल्ह्यापासून दिडशे कि.मी.अंतरावर आहे.येथील लोकांना नांदेड येथे कामानिमित्त जाणे-येणे करावे लागते.या प्रवासाकरीता एसटी बसच्या फक्त दोनच फेऱ्या होत्या. रेल्वे चा आसरा आहे.पण सध्या मागील काही महिन्यांपासून रेल्वे उशीरा येणे, ऐनवेळी रद्द होणे इत्यादी गोष्टींमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून याचा परिणाम तालुक्यातील जनतेवर पडला आहे.

त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून बस खेळांमध्ये वाढ करण्याचा निर्णय किनवट आगारांनी घेतला असून सकाळी ०५.३० वाजता लातूरकरिता नांदेड मार्गे बस सोडण्यात येत आहे.लगेच ०६.३०,व दुपारी १२.३० वाजता नांदेड करीता किनवट आगारातून एसटी सुटेल,परतीच्या प्रवासाला नांदेड येथून किनवट करीता सकाळी ०८.३० वाजता, १०.३० वाजता व सायंकाळी ०५.०० वाजता नांदेड आगारातून एसटी सुटेल.


सदर एसटीचा प्रवाशांना दवाखाना,व्यापार व इतर गोष्टीसाठी सवलतीचे होईल. नांदेड करीता वाढलेल्या एसटीमुळे प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. याचप्रमाणे प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन किनवट येथून सायंकाळी सहा दरम्यान गाडी सोडण्याचे आश्वासनही आगार प्रमुख एस. टी. शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.


