किनवट। येथे नैतिक नाईक & असोशियट (𝚊𝚍𝚟𝚘𝚌𝚊𝚝𝚎 &𝚝𝚊𝚡 𝚌𝚘𝚗𝚜𝚞𝚕𝚝𝚊𝚗𝚝 ,𝚊𝚞𝚝𝚑𝚘𝚛𝚒𝚜𝚎𝚍 𝚊𝚞𝚍𝚒𝚝𝚘𝚛) शाखेचे आज आम्बेडकर चौक गणपती मंदिर समोर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घघाटन झाले.
किनवट/माहुर तालुक्यातील लघु उद्योजक,शैक्षणिक संस्था, व्यापारी, एन.जी.ओ तसेच विविध व्यावसायिकाना या फर्मची अद्यावत करसल्ला व करसेवा व लेखा परीक्षनाचा लाभ मिळणार आहे. नांदेड़ येथे या फर्मचे मुख्य कार्यालय असून आज किनवट येथे दूसरा शाखेचे विधिवत आमदार महोदयाच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी विधी क्षेत्रातिल अनेक नामवंत मंडळीची उपस्थिती होती तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक ,किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जेष्ठ विधीतज्ञ एड,शंकर राठोड़, बाबूराव केंद्रे,बबलू नाईक,गोरसेना जिल्हाध्यक्ष अतुल राठोड़ ,एड प्रदीप राठोड़,माहुर नगर पंचयातचे नगरसेवक गोपू महामूने, अरुण राठोड़, एड राहुल नाईक,एड सुरज राठोड़, एड,चेतन नाईक, पत्रकार कागने मामा,बाबू नेमानिवार, जगदीश सानपेल्लीवार् , दुर्गा राठोड़, सचिन जाधव ,पंकज जयसवाल यांची उपस्थिती होती.