किनवट, परमेश्वर पेशवे| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, पक्षाच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घरोघरी पोहचण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चालु असलेल्या अभियानाला किनवट तालुक्यातील ईस्लापुर जिल्हा परिषद सर्कलमधिल,भिसी, व पांगरी,या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे पदाधिकारी यांनी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी गावातील लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आले असता या वेळी गावातील, पुरूष मंडळी,नवयुवकांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नावाने घोषणाबाजी करून यावेळी अबकी बार प्रदीप नाईक आमदार म्हणत विशेष पुढाकार घेतला होता.



नवयुवकांनी यावेळी प्रदीप नाईक यांना आमदार बनविल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा निर्धार केला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ईस्लापुर शिवणी सर्कलच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ पंचफुलाबाई शिवराम जाधव, डॉ भगवान गंगासागर , ईस्लापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद भाऊ राठोड,व गावातील प्रतिष्ठीत नागरिक व ,युवक मंडळी मोढ्या संख्येने उपस्थित होते, गावकऱ्यांचा एकच निर्धार आब कि बार नाईक आमदार असे म्हणत गाव तांडे वाड्यात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.





