क्राईमनांदेड

Biloli Murder ; बिलोलीत संपत्तीच्या वादात; भावानेच केला भावाचा खून

बिलोली, गोविंद मुंडकर। येथील आंबेडकर नगरात राहणाऱ्या दोन सख्ख्या भावात संपत्तीच्या कारणावरून वाद होऊन लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.याबाबत बिलोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, बिलोली शहरातील आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या लाखे परिवारात संपत्तीच्या कारणावरून अनेक दिवसापासून वाद असल्याचे समोर आले आहे. या वादातून दोन भावात वैमनस्य पसरले आणि त्याचे रूपांतर खुनात झाल्याचे प्रथम दर्शनी तपासात पुढे आले आहे. आंबेडकर वसाहतीत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना लहान भावाने मोठ्या भावाचा अज्ञात इसमाने खून केल्याची बाब कळविले.

वस्तीतील लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी अधिक तपास केला असता भावानेच भावाचा संपत्तीच्या कारणावरून खून केल्याची बाब प्रथमदर्शनी समोर आलेली आहे. लहान भावाने छातीवर चाकूने मारून खून केल्याची घटना दि १६/एप्रिल रात्री ११वाजता घडली. पोलिस उप निरीक्षक लोखंडे यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.मयताच्या संशयित लहान भावास अटक करण्यात आली आहे.

शहरातील अंबेडकर नगर येथील रहिवासी सुनील प्रल्हाद लाखे व नागेश प्रल्हाद लाखे या दोन सख्ख्या भावात झालेल्या दि 16 एप्रिल 2025 रोजीच्या वादात चे रूपांतर खुन झाल्याची बिलोली पोलीस स्थानकात नोंद घेण्यात आली. मयताचा छोटा भाऊ नागेश प्रल्हाद लाखे यांनी आपला मोठा भाऊ सुनील प्रल्हाद लाखे यांचा खून केल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलिस स्टेशन येथे गु,र, क्र, 89/25 103(2)B, N,S, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढिल तपास स,पो, कमल शिंदे हे करीत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!