किनवट,परमेश्वर पेशवे। दिनांक 03 जुलै रोजी अंबाडी – धामणदरी रोडवर गस्त करत असतांना संशयावरून पांढऱ्या रंगाची tata intra v30 मध्ये अवैध सागी गोल माल भरताना दिसली असता सदर आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहन सोडून आरोपी पळून गेले. टाटा इंडिका tata intra v30 वाहन क्रमांक MH 26 CH 0476 पकडण्यात आले सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधसागी गोल नग -15 आढळून आले. आज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


हया कार्यवाहीत मा. उपवनसंरक्षक नांदेड श्री केशव वाबळे साहेब मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री.जी. डी.गिरी साहेब मा.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.किनवट पी. एल.राठोड यांच्या मार्गद्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी अंबाडी बी. एस संतवाले, एम.एन. कतुलवार, एस. एम. कोम्पलवार, एस. एम. यादव, हारी चौधरी पाटील, वनरक्षक कु.एस एस.काकडे, मुकुंद डोईफोडे, रवि दांडेगावकर, कल्पना खराटे तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवले, भोजू जाधव यांचा या कार्यवाहीत सक्रिय सहभाग होता.



जप्त केलेल्या अवैध सागी मालाचा तपशील खालील प्रमाणे नग संख्या 15 घ मी.1.634 माल किंमत 34477=00 रुपये टाटा tata intra v30 कार किंमत अंदाजे 500000=00 रुपये जप्त केलेला एकूण मुद्देमाल 534477=00 रुपयाचा आहे. पुढील चौकशीसाठी वनविकास महामंडळ किनवट यांच्या कडे प्रकरण हस्तांतरीत करण्यात आले आहे.




