नांदेडकृषी

In Sibdara village, there is sadness on Bullopola festival : सिबदरा गावात बैलपोळा सणावर दुःखाचं सावट; विजेचा शॉक लागून बैल दगावला -NNL

हिमायतनगर। तालुक्यातील मौजे सिबदरा येथील शेतकरी गुरुदास सायन्ना घोसलवाड हे कापसाची वखरणी करत असतांना त्यांच्या शेतात असलेल्या महावितरण कंपनीच्या खांबाच्या तणावातुन  उतरलेल्या वीजेचा धक्का एका बैलास लागून दगावल्याची दुर्दैवी घटना बैलपोळा सणाच्या दोन दिवस पूर्वी घडली आहे. या घटनेमुळे सीबदरा गावावर दुःखच सावट पसरलं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे सीबदरा येथील शेतकरी आपल्या शेतातील कापसाच्या पिकाची तण जास्त झाल्याने वखरणी करीत होता. दरम्यान पाऊस सुरू झाला आणि शेतात असलेल्या वीज खांबाच्या तणावाला बैलाचा धक्का लागला. अचानक तणावाच्या तारातून विज उतरल्याने शेतात ओताच्या बैलाला शॉक लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.

आगोदरच बळीराजा कर्जाच्या डोंगरात बुडालेला असताना यंदाच्या खरीप हंगामात उत्पादन चांगल मिळेल व डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर कमी होईल या आशेवर होता. ऐन पोळा सणाच्या तोंडावर बैल दगावल्याच संकट आल्याने शेतकरी हताश झाला आहे. या घटनेमुळे सीबदरा गावावर शोककळा पसरली असून, बैलपोळा कसा साजरा करावा या विचारात गावकरी आहे. चार दिवस अगोदर तालुक्यातील टेेंभुर्णी येथील शेतकऱ्यांच्या शेतात वीज कोसळून बैल दगावला होता. त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे, महावितरण कंपनीने याची दखल घेऊन शेतकऱ्यांस नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी केली जाते आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button