HomeनांदेडPeaceful response at Osmannagar : मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उस्माननगर येथे...

Peaceful response at Osmannagar : मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उस्माननगर येथे शांततेत प्रतिसाद -NNL

उस्माननगर,माणिक भिसे| अंतरवाली – सराठी येथे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ दि.२३ सप्टेंबर रोजी नांदेड बंदचे आवाहन केले होते या बंदमध्ये उस्माननगर येथील सकल मराठा बांधवांनी सहभाग घेऊन मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवीला.

सकल मराठा समाजाच्या वतीने दि.२३ सप्टेंबर रोजी पोलिस स्टेशन उस्माननगर ला सपोनि यांना निवेदन देऊन बंदचे आवाहन करण्यात केले होते . यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शवित सकल मराठा समाजाच्या वतिने उस्माननगर येथील व्यापा-यांनी ,शैक्षणिक संस्थानी , प्रतिसाद देत सर्व दुकाने ,कापड दुकाने ,हाॅटेल्स , मेडिकल,व दवाखाणे वगळून सर्व प्रतिष्ठाने बंद स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले .मराठा समाजाला ओबीसीं प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून सहावेळेस आमरण उपोषणाला बसलेले मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेड जिल्हा बंदच्या हाकेला उस्माननगर कडकडीत बंद ठेवून उस्फुर्त प्रतिसाद दिला.उस्माननगर येथील गावातील प्रमुख मार्गावरून सकल मरा बांधवाच्या वतिने रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील याच्या घोषणा दिल्या.

आरक्षण आमच्या हक्काचे एक मराठा लाख मराठा यासह विविध घोषणा मराठा समाज बांधवाच्या तरूणांनी दिल्या या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवाची उपस्थितिती होती . उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुर्यंशी ,केंद्रे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग उस्माननगर चौक ,बस्टॅन्ड व गावातील प्रमुख मार्गावर चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments