धार्मिकनांदेडलेख

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 18(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

अमरनाथच्या गुहेतून ही लेखमाला दररोज प्रसिद्धी देण्यात येत होती. या लेखमाले ला वाचकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. ही लेखमाला वाचून वाचकांनी दिलेल्या असंख्य प्रतिक्रिया पैकी जागेअभावी निवडक प्रतिक्रिया या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे. – संपादक

ज्येष्ठ पत्रकार विश्वास गुंडावार – “‘अमरनाथ गुहेतून’ वाचताना माझ्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष यात्रा उभी राहिली. शब्दांचा सुगंध, अनुभवांची गंधस्पर्शी रचना आणि हिमालयाचे हृदयात वितळणे – हे केवळ लेखन नाही, तर हे एक आध्यात्मिक पुनर्जन्म आहे.”
विकास रेनगुंटवार – “सहज, सरळ, पण परिणामकारक! संवादी शैली आणि ठिकाणांची समर्पक मांडणी. ओघवते पण त्रोटक नाही, पाल्हाळ नाही – म्हणूनच रसाळ आणि वाचनीय.”

डॉ. द्वारकादास नखाते – “१६ भाग एकाच दमात वाचले आणि जणू प्रत्यक्ष यात्रेत होतो. तुमची लेखणी हीच हिमालयाची ताकद आहे. बाबा भोलेनाथचं आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो.”
दत्तात्रय देबडवार – “संपूर्ण यात्रेचा अनुभव संग्राह्य करून आमच्यासमोर ठेवणं हे तुमचंच काम. तुमचं मन:पूर्वक आभार आणि पुढील यात्रांसाठी शुभेच्छा!”
माणिक गुमटे – “२५वी यात्रा वाचताना वाटलं आपणही ग्रुपमध्ये आहोत. प्रत्येक सहकारी, प्रत्येक सेवाभावी हृदयाला स्पर्शून गेला. आपलं कार्य त्रिवार वंदनीय.”
आनंद साताळे – “वाचनातून आम्ही एका वर्षापूर्वीच्या आठवणीत हरवून गेलो. मन भरून आलं, बाबा बर्फानीचे नामस्मरण ओठावर आले.”
सुभाष तोष्णीवाल – “प्रत्येक वर्षीचं लेखन पुस्तक स्वरूपात मिळावं अशी मनापासून इच्छा आहे. तुमचं लेखन संग्राह्य ठेवलं पाहिजे.”

राजू सगरोळीकर – “यात्रेचं इतकं सुंदर चित्रण केलंत की प्रत्यक्ष अनुभव वाटतो. भोलेबाबांची कृपा असेल तर पुढच्या वर्षी तुमच्यासोबत दर्शन घडेल.”
डॉ. संजय महाजन – “२५ वर्षे अखंड अमरनाथ यात्रा? हे शक्यच नाही – शिवाय कृपा आणि तुमचं अपार समर्पण नसता!”
श्रीधर शिंदे, पोलीस पाटील – “एखादा उत्तम चित्रपट अनुभवावा तसं तुमचं लेखन. बाबा बर्फानींची कृपा तुमच्यावर स्पष्ट दिसते.”
माधव उम्मनवार,छ.संभाजीनगर – “सेवानिवृत्तीनंतर वाचन केलं आणि ठरवलं – आता तुमच्या सर्व टूरला सहभागी व्हायचंच! कृपया टूरच्या तारखा कळवा.”

( आमच्या आगामी टूर :मध्य प्रदेश 13 ऑगस्ट -6 दिवस ;कोकण 18 आगस्ट -7 दिवस ;कोस्टल कर्नाटका 8 सप्टेंबर -7 दिवस ;दक्षिण भारत 4 ऑक्टोबर -10 दिवस ;अंदमान 9 नोव्हेंबर – 6 दिवस ;उत्तर प्रदेश 26 नोव्हेंबर -9 दिवस ;गुजरात 4 डिसेंबर -9 दिवस ;गंगासागर 3 जानेवारी 2026- 9 दिवस ;राजस्थान 10 फेब्रुवारी 2026-10 दिवस ;नेपाळ 4 मार्च 2026-11 दिवस ;हिमाचल 10 एप्रिल 2026-10 दिवस ;चारोधाम 4 मे 2026-14 दिवस ;विशेष :26 वर्षांचा अनुभव,महाराष्ट्रीयन भोजन, उत्कृष्ट निवास व वाहतूक व्यवस्था, भरपूर मनोरंजन )

संगिता दमकोंडावार – “लेखन वाचून मनात प्रार्थना आली – बाबा, आम्हालाही दिलीपभाऊंसोबत दर्शन घडू दे!”
हणमंत जाधव पाटील – “लेखन वाचून आतून काहीतरी मिळालं… हे शब्दात सांगता येणार नाही. 2028 नंतर तुमच्यासोबत यायला उत्सुक आहे.”
किशोर जवळकर – “२५ वर्षांचा प्रवास म्हणजे परिश्रमांची आणि प्रेमाची पावती आहे. नांदेडकरांना तुमच्यासारखा यज्ञकर्ता लाभणं हे भाग्यच!”
प्रतीक्षा पद्माकर केंद्रे – “माझी पहिलीच यात्रा, पण तुमच्या सहवासात भीती विरून गेली. आजुबाजूचे सर्वजण आपल्या वाटले. ही यात्रा आयुष्यभर लक्षात राहील.”
माधवराव फुलारी – “वाचनातून मी तुमच्यासोबत यात्रा करत आहे असं वाटलं. कंधारला तुमचं स्वागत करायचं भाग्य मिळो, हीच इच्छा.”

स्नेहलता जायस्वाल – “तुमचं ऊर्जा पातळी अमानवी आहे की काय असं वाटतं! लेखनातली बारकावे, नावं, संदर्भ… सगळं प्रेरणादायी. सलाम तुमच्या कार्याला!”
बलभीम पत्की – “तुमचं नियोजन, संयम, अनुभव – सगळं अप्रतिम. तुमच्यामुळेच हजारो यात्रेकरूंना अमरनाथचं दर्शन सुखरूप मिळतं.”
सुभाष देवकते – “नांदेडकरांसाठी अमरनाथ यात्रा हे स्वप्न तुमच्यामुळे साकार होतंय. डोंगर, धोका, अडचणी – सगळं पार करून दर्शन घडवणं ही तुमची अमृतयात्रा!”
अलका कहाळेकर – “समाजासाठी कार्य करणं ही सेवा असते. पण तुम्ही समाजाचं देणं शतपटीने परत करता. तुमचे उपक्रम म्हणजे प्रेरणादायी ग्रंथ आहेत.”
डॉ. सुनीता गोधमगावकर – “घरबसल्या अमरनाथ यात्रा अनुभवल्याचं समाधान तुमचं लेखन देऊन गेलं. अक्षरश: रोमहर्षक अनुभव!”
श्रीकांत मगरे – “दादा, हे पुस्तक व्हायलाच हवं! बेस्टसेलर ठरेल यात शंका नाही.”
नरसिंग गुर्रम – “सर, तुमचं काम खरोखर अतुलनीय आहे. भोलेनाथ आपल्याला सदैव सुखी ठेवो.”

शेख शफी – “तुमच्या लेखांतून आम्हालाही २५ वी यात्रा अनुभवायला मिळाली. आणि बाबा बर्फानींनी वेळेत तुम्हाला परत आणलं, हेही भाग्य!”
कुबेर राठोड – “तुमच्या सारखं संयम, सेवा, नेतृत्व आणि आध्यात्मिक ऊर्जा असलेलं व्यक्तिमत्त्व दुर्मिळ आहे. शुभेच्छा!”
शारदा कठाले – “प्रत्येक दिवसाची माहिती वाचून असं वाटलं – आपण प्रत्यक्ष अमरनाथला गेलो. धन्यवाद दिलीपभाऊ!”
मंगला केसकर – “चार वर्षांपूर्वीचा दौरा जशास तसा आठवला. तुमचं वर्णन म्हणजे अमरनाथचं स्मरण.”
प्रदीप दांडेगावकर – “तुमचं लेखन म्हणजे आमच्यासाठी परत एकदा यात्रा. लेखणीची हीच कमाल!”
अनिल श्रीराळकर – “अमरनाथ आणि वैष्णोदेवी संदर्भातली इतकी सुसंगत, सौंदर्यपूर्ण माहिती – वाचक म्हणून ऋणी आहे.”
प्रकाशसिंह चौहान – “दिलीपभाऊंचं काम ही केवळ सेवा नाही – ती एक तपश्चर्या आहे. लेखांमधून जणू मीच त्या यात्रेत होतो.”
सुषमा गहेरवार – “लेखन वाचून वाटलं – आपणच त्यात होतो. गेम्स, मजा आणि सूक्ष्म तपशील सगळं जिवंत! धन्यवाद!” (क्रमश:)

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button