Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 18(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
अमरनाथच्या गुहेतून ही लेखमाला दररोज प्रसिद्धी देण्यात येत होती. या लेखमाले ला वाचकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. ही लेखमाला वाचून वाचकांनी दिलेल्या असंख्य प्रतिक्रिया पैकी जागेअभावी निवडक प्रतिक्रिया या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे. - संपादक
ज्येष्ठ पत्रकार विश्वास गुंडावार - "‘अमरनाथ गुहेतून’ वाचताना माझ्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष यात्रा उभी राहिली. शब्दांचा सुगंध, अनुभवांची गंधस्पर्शी रचना आणि हिमालयाचे हृदयात वितळणे – हे केवळ लेखन नाही, तर हे एक आध्यात्मिक पुनर्जन्म आहे."
विकास रेनगुंटवार - "सहज, सरळ, पण परिणामकारक! संवादी शैली आणि ठिकाणांची समर्पक मांडणी. ओघवते पण त्रोटक नाही, पाल्हाळ नाही – म्हणूनच रसाळ आणि वाचनीय."
डॉ. द्वारकादास नखाते - "१६ भाग एकाच दमात वाचले आणि जणू प्रत्यक्ष यात्रेत होतो. तुमची लेखणी हीच हिमालयाची ताकद आहे. बाबा भोलेनाथचं आशीर्वाद तुम...
