नांदेड

नवज्योतसिंघ गाडीवाले यांची घरवापसी; मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश -NNL

नांदेड| शिवसेनेचे युवा नेतृत्व नवज्योतसिंघ गाडीवाले यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या पुढाकारातून मातोश्रीवर शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत , संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

सकारात्मक राजकारणातून नांदेड जिल्ह्यातील युवकणाध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व नवज्योतसिंघ गाडीवाले हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते शिवसेनेत कार्य करत राहिले मात्र दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता मात्र येथे केवळ दोनच महिन्यात त्यांनी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत घरवापसी करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी जिल्हाप्रमुख माधव पावडे यांची शिष्टाई कामाला आली. माधव पावडे यांच्या जिल्हा प्रमुख पुढाकारातून मातोश्रीवर शिवसेना सचिव विनायक राऊत , संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत नवज्योतसिंघ गाडीवाले यांना शिवा बंधन बांधण्यात आले. यावेळी सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे , भुजंग पाटील , जिल्हाप्रमुख माधव पावडे , बंडू खेडकर, बबन बारसे, जिल्हा संघटक नेताजी भोसले , उपजिल्हा संघटक अविनाश तरोडेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. भविष्यात प्रामाणिकपणे काम करून शिवसेनेला बळकटी देऊ असा विश्वासही यावेळी गाडीवाले यांनी व्यक्त केला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!