नांदेड| जयस्तुतै, श्री महामंगले हे विर सावरकरांचे अजरामर गित धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ६१ राष्ट्रभक्तांनी चक्क ३५ हजार फुट ऊंचीवर थेट विमानात गायल्याची घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे अंदमान सहलीवर गेलेल्या सर्व सावरकर भक्तांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


सात दिवसाच्या अंदमान सहलीचे पहिल्यांदाच आयोजन ॲड. दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांनी केले होते. अंदमान ते हैदराबाद या परतीच्या प्रवासात दिलीप ठाकूर यांनी जयस्तुते हे गीत सामूहिकरीत्या गाण्यासाठी पायलटची परवानगी घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नांदेडच्या सर्व पर्यटकांनी हे गीत सामुहिकरीत्या गाण्याचा सराव केल्यामुळे विमानात कोणतीही अडचण आली नाही. विशेष म्हणजे विमानात बसलेल्या २८० प्रवाशांपैकी बहुतेकांनी नांदेडच्या पर्यटकांसमवेतच हे गीत गायले. भारत माता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र वीर सावरकरांचा विजय असो या घोषणांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. टाळ्यांच्या कडकडात या अभिनव प्रयोगाचे सर्वांनी स्वागत केले. अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये या प्रसंगाचे चित्रण केले.विमान प्रवास संपल्यानंतर हवाई सुंदरी सह अनेकांनी दिलीप ठाकूर यांच्या समवेत सेल्फी घेऊन त्यांच्या राष्ट्रभक्तीचे कौतुक केले.

यापूर्वी भाऊ ट्रॅव्हल्स व माय हॉलिडेज च्या वतीने २४ वर्षात अनेक धार्मिक यात्रांचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आलेले आहे.नांदेडसह मुंबई, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, परभणी, लातूर,वसमत व हैद्राबाद येथील पर्यटक अंदमान सहलीमध्ये सहभागी झाले होते. पृथ्वीवर असलेल्या सर्व दळणवळण साधनांचा उपयोग या सहलीमध्ये करण्यात आला.नांदेड हैद्राबाद नांदेड रेल्वे प्रवास,हैद्राबाद श्री विजयपुरम हैद्राबाद विमान प्रवास,श्री विजयपुरम इतर बेटांना जाता येतांना केलेला क्रुझ, स्टिमर,स्पीड बोटचा प्रवास,बारतांग ला जाता येताना केलेला रस्त्याचा वापर,समुद्रातील जीवन सृष्टी पाहण्यासाठी पाण्याखालून सब मरीन ने मारलेला फेरफटका आणि चुनखडीच्या गुहा पाहण्यासाठी जंगलात केलेली अडीच किलोमीटर ची पायपिट करण्यात आली.

यामुळे जल, भूमी,आकाश या तिन्ही ठिकाणी पर्यटकांचा विहार झालेला आहे. सात दिवसाच्या कालावधीत सेल्युलर जेल, पोर्ट ब्लेअर, रॉस आयलँड, नॉर्थ बे आयलँड, बाराटांग बेट, हॅवलॉक आयलँड या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यात आल्या.जंगलात राहणाऱ्या जारवा आदिवासींना पाहता आले. वातानुकूलीत तृतीय वर्गाचा रेल्वे प्रवास, आरामदायी चार टेम्पो ट्रॅव्हल्स, तृतीय व चतुर्थ तारांकित हॉटेलात सुसज्ज रूम मध्ये सर्वांची निवास व्यवस्था करण्यात आली होती. सर्वच ठिकाणी वेळेवर रुचकर भोजन व मुबलक प्रमाणात मिनरल वॉटर दिल्यामुळे प्रत्येकाची प्रकृती चांगली राहिली.दिलीप ठाकूर यांनी वेळोवेळी घेतलेले मनोरंजक खेळ, अंताक्षरी,प्रत्येक प्रवाश्यांवर केलेले मार्मिक विनोद यामुळे प्रवासाची रंगत वाढली. संदीप मैंद,टूर मॅनेजर जयंत वाणी,विशाल मुळे,किरण मोरे यांनी सर्वांची वैयक्तिक काळजी घेतली.


दहा नोव्हेंबरला गुजरात स्पेशल, पंचवीस नोव्हेंबरला दक्षिण भारत,तेरा डिसेंबरला कोस्टल कर्नाटक, एक जानेवारी २०२५ ला गंगासागर यात्रा, सतरा जानेवारी ला दुसरी अंदमान सहल,तेवीस जानेवारीला राजस्थान स्पेशल यात्रा काढण्यात येणार आहे. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात अयोध्या,वाराणसी प्रयाग चा समावेश असलेली उत्तर प्रदेश टूर, मार्चमध्ये नेपाळ, एप्रिलमध्ये हिमाचल स्पेशल, मे मध्ये केरळ टुर तसेच चारोधाम यात्रा, जून व जुलै महिन्यात अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पहिल्याच अंदमान सहलीमध्ये दिलीप ठाकूर, संदीप मैंद व त्यांच्या टीमने अंत्यत नियोजनबद्ध व्यवस्था केल्याबद्दल सर्व पर्यटकांनी समाधान व्यक्त केले. ॲड.दिलीप ठाकूर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या नाविन्यपुर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सदैव जनसेवेत, समाजसेवेत कार्यरत असतात. या वेळेस या ध्येयवेड्या, प्रखर राष्ट्रभक्तिने औतप्रोत ठासून भरलेल्या विर सावरकर प्रेमीने अंदमान बेटावर जाऊन आपल्या देशप्रेमी साथीदारांना सोबत घेवून विर सावरकरांच्या पावन चरणी नतमस्तक झाले. विमानात एकमेकांशी न बोलणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानण्यात येत असताना चक्क वीर सावरकरांचे गीत सामूहिक रित्या गाण्याचा विक्रम पहिल्यांदाच केल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.