क्राईमनांदेड

Degalur Murder : किरकोळ वादातून तरुणाचा खून — देगलूर शहर हादरले!

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील नवीन सराफा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ आणि जुन्या वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अंबिका ऑईल मिलच्या बाजूस असलेल्या देशी दारू दुकानात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव शेख निसार शेख बाबुमिया (वय ३०, रा. मदीना मस्जिद, लाईन गल्ली, देगलूर) असे आहे. किरकोळ वादावरून झालेल्या भांडणात आरोपीने शेख निसार यांच्या मानेवर धारदार वस्तूने वार केला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्थागुशा आणि देगलूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने परिसराचा पंचनामा करून साक्षीदारांची चौकशी सुरू केली. दरम्यान, आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक तपासात आरोपीचे नाव शेख शादुल सलीमसाब (वय ४५, रा. आनंदनगर, भायेगाव रोड) असे समोर आले आहे. किरकोळ वादातून रागाच्या भरात आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला करून शेख निसार यांचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या घटनेमुळे देगलूर शहरात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, तपासाचे काम पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी हे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button