Friday, June 26

Tag: Degalur city shaken!

Degalur Murder : किरकोळ वादातून तरुणाचा खून — देगलूर शहर हादरले!

Degalur Murder : किरकोळ वादातून तरुणाचा खून — देगलूर शहर हादरले!

क्राईम, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील नवीन सराफा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ आणि जुन्या वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अंबिका ऑईल मिलच्या बाजूस असलेल्या देशी दारू दुकानात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव शेख निसार शेख बाबुमिया (वय ३०, रा. मदीना मस्जिद, लाईन गल्ली, देगलूर) असे आहे. किरकोळ वादावरून झालेल्या भांडणात आरोपीने शेख निसार यांच्या मानेवर धारदार वस्तूने वार केला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्थागुशा आणि देगलूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने परिसराचा पंचनामा करून साक्षीदारांची चौकशी सुरू केली. दरम्यान, आरोपी स्वतःच पोलिस ठा...
error: Content is protected !!