नांदेड,अनिल मादसवार| मागील अडीच महीन्यापुर्वी हिमायतनगर पोलीस ठाणे हध्दीत दरोडयाचा गुन्हया घडला होता. यापुर्वी त्या गुन्हयातील दोन आरोपीतास अटक करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना पाहिजे असलेले चार आरोपीतांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी तीन आरोपीताना दिनांक 03 ऑकटोबर 2024 रोजी अटक करून त्यांचे ताब्यातुन मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, प्रल्हाद भाऊराव मिरासे, वय 38 वर्षे, रा. वडगाव खु. ता. हिमायतनगर नांदेड हे दिनांक 17 मार्च 2024 रोजी रात्रीच्या सुमारास हिमायनगर ते भोकर जाणारे रोडवर सरसम येथील खव्वा सेंटरच्या पुढील वळणावर मोटार सायकने जात असतांना चार इसमांनी फिर्यादीची मोटार सायकल अडवुन त्यंना चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीचा 12.000/- रू किमतीचा मोबाईल व नगदी 13,000/-रू दरोडा घातला. तसेच पुढे जाऊन पोटा येथील मनिष आश्रम शाळेच्या गेटसमोर हायवेवर एका मुलाचा 10,000/- रू चा मोबाईल असा एकुण 35,000/-रू चा ऐवज जबरीने हिसकावुन घेऊन पळुन गेले होते. सदर तक्रारीवरून अज्ञात आरोपीतां विरूध्द हिमायतनगर पोलीस डायरीत गुन्हा क्रमांक108/2024 कलम 392, 341, 34 भादवि कायदा प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना गुन्हयात एकुण सहा आरोपीतांचा समोवेश असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात दरोडयाचे कलम 395 भादवि वाढ करण्यात आलेले आहे.

सदर गुन्हयातील अरोपीताचा शोधा करीता आजु बाजुचे पोलीस स्टेशनला माहीती देवुन तपास करीत असताना दोन आरोपीतांना दिनांक 01.06.2024 रोजी अटक करून त्यांचे ताब्यातुन दोन मोबाईल व रोख रक्कम 3.800/- रू असा मुद्येमाल यापुर्वी हस्तगत करण्यात आला होता. उर्वरीत चार पाहिजे असलेल्या आरोपीतांचा शोध घेत असतांना गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रीक पध्दतीने तपास करत असतांना खालील नमुद तीन पाहिजे असलेले आरोपी लखन विनोद पिंपळे, वय 23 वर्षे, रा. विठ्ठलवाडी, हिमायतनगर, कुणाल उर्फ लक्की वैजनाथ बोड्डावार, वय 24 वर्षे, रा. दत्तनगर नांदेड, विजय तुकाराम अडबलवार, वय 25 वर्षे, रा. तरोडा बु नांदेड हे बोरगडी रोड व पळसपुर टी पॉईंट, हिमायतनगर या ठिकाणी संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यावरून प्राप्त माहितीने पोलिसांनी सादर ठिकाणी पोलीस पथक पाठवुन त्यांना दिनांक 03 ऑगस्ट 2024 रोजी शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेला एक चाकु व रोख रक्कम 4,200/- रू जप्त करण्यात आली आहे.


सदरची कामगीरी पोलीस अधीक्षकश्रीकृष्ण कोकाटे, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, डॅनिअल बेन, उपविभागीय पोलीस अधीकारी भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हिमायतनगर पोनि अमोल भगत, मपोउपनि श्रीमती निता कदम, मसपोउपनि कोमल कागणे, पोहेकॉ श्याम नागगरगोजे, पवन चीदते, यानी अथक परिश्रम घेऊन केली आहे. मोठ्या शिताफीने सदर तीन पाहिजे असलेले आरोपीतांना अटक करून उत्कृष्ट कामगीरी केली आहे. याबद्दल वरिष्ठानी त्याचे अभिनंदन केले आहे.


