Bhaji-Bhakri : बारालिंग मंदिरात भाजी–भाकरी महाप्रसादासाठी उस्फूर्त गर्दी; यात्रेविना प्रथमच भव्य पंगत

IMG 20260115 194122 Bhaji-Bhakri : बारालिंग मंदिरात भाजी–भाकरी महाप्रसादासाठी उस्फूर्त गर्दी; यात्रेविना प्रथमच भव्य पंगत

हदगांव, गौतम वाठोरे| तालुक्यातील तामसा येथील प्राचीन बारालिंग मंदिरात गुरुवारी (ता. १५) भाजी–भाकरी महाप्रसादासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. यंदा यात्रेविना प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात पंगतीचे आयोजन करण्यात आल्याने हा उपक्रम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला.

पहाटे ‘श्री’ंच्या अभिषेकानंतर भाजी शिजविण्याला सुरुवात करण्यात आली. सकाळपासूनच दर्शन व महाप्रसादासाठी महिला-पुरुष भाविकांची मोठी वर्दळ दिसून आली. दुपारी महंत व्यंकटस्वामी महाराज, बिरागीदास महाराज व शिवचैतन्य महाराज यांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न झाली. त्यानंतर महाप्रसाद वितरणाला प्रारंभ झाला.

IMG 20260115 WA0055 Bhaji-Bhakri : बारालिंग मंदिरात भाजी–भाकरी महाप्रसादासाठी उस्फूर्त गर्दी; यात्रेविना प्रथमच भव्य पंगत

शहरासह परिसरातील अनेक गावांतून भाविकांनी भाकरी मोठ्या संख्येने आणून या धार्मिक उपक्रमात सहभाग नोंदवला. दुपारच्या सुमारास मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. मंदिराकडे जाणारे रस्ते व पायवाटा भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले होते.

IMG 20260115 194149 scaled Bhaji-Bhakri : बारालिंग मंदिरात भाजी–भाकरी महाप्रसादासाठी उस्फूर्त गर्दी; यात्रेविना प्रथमच भव्य पंगत
Oplus_16908288

महाप्रसाद घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. मंदिर परिसरातील शेतात अनेक कुटुंबांनी वनभोजनाचा आनंद घेतला. रात्री उशिरापर्यंत दर्शन व प्रसादासाठी भाविकांची ये-जा सुरूच होती. मराठवाडा, तेलंगणा व विदर्भातून आलेल्या सुमारे पन्नास हजारांहून अधिक भाविकांना सुमारे दीडशे क्विंटल भाकरी व तीनशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद वितरित करण्यात आला.

IMG 20260115 WA0050 scaled Bhaji-Bhakri : बारालिंग मंदिरात भाजी–भाकरी महाप्रसादासाठी उस्फूर्त गर्दी; यात्रेविना प्रथमच भव्य पंगत

या महाप्रसादासाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, बाबुराव पवार पाथरडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विवेक देशमुख, गटविकास अधिकारी दशरथ आडेराघो, भाजप तालुका अध्यक्ष भागवत देवसरकर, कृष्णा पाटील आष्टीकर, निवृत्त तहसीलदार बालाजी चितळे, भास्कर वानखेडे आदी मान्यवरांनी हजेरी लावली.

महाप्रसाद वितरणात ग्रामस्थ, व्यापारी व शेकडो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता. कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक संकेत दिघे, भोकरचे पोलीस निरीक्षक कुंभार, फौजदार बालाजी नरवटे, पोलीस अधिकारी अशोक शिंगणवाडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top