लोहा| देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी उज्जवला गॅस ,शौचालय यासह महिला सशसक्तीरणासाठी अनेक योजना आणल्या आहेत. “स्वस्थ नारी-सशक्त परिवार” हे आरोग्य अभियान आपल्या माता आणि भगिनींसाठी समर्पित आहे. भारतातील एकही महिला आवश्यक सुविधा किंवा संसाधनांच्या अभावामुळे आजाराची बळी ठरू नये हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून लोहा उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी हे आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. केंद्र व राज्यातील सरकार आरोग्यविषयक अनेक जनहिताचे निर्णय घेत आहे. असे प्रतिपादन भाजपा महिला प्रदेश आघाडीच्या उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.


लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने महायुती सरकारच्या वतीने दिन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ हे विशेष मोफत आरोग्य शिबिर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.


भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अब्दुल बारी माजी नगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल दत्ता वाले, माजी नगरसेविका शोभाताई बगडे, रुग्ण कल्याण समितीचे सल्लागार मारुती पाटील बोरगावकर वैद्यकीय अधिकारी, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. दिनेश राठोड, डॉ. रोहीत ठक्कर, डॉ.सौ पानझाडे, डॉ. रोशन मॅडम , हरिभाऊ चव्हाण डॉ दीपक मोटे, डॉ रुबी मॅडम, डॉ रोहित ठक्करवाड भानुदास पवार,बाळा पवार, गणराज केंद्रे, ऋषिकेश सलगरकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स,आरोग्य कर्मचारी,रुग्ण मोठ्या संख्यने उपस्थित होते.


स्वस्थ नारी-सशक्त परिवार “आरोग्य शिबिरास मार्गदर्शन करताना प्राणिताताई म्हणाल्या की, मातृशक्ती ही राष्ट्रशक्तीचा भक्कम पाया आहे. म्हणूनच मातृशक्तीच्या कल्याणासाठीच्या या अभिनव उपक्रमाअंतर्गत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष अभियानामध्ये उच्च रक्तदाब,मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, सिकल सेल,ऍनिमिया सह विविध तपासणी करण्यात येणार आहे.किशोरवयीन मुलींसाठी स्वच्छतेबाबत जनजागृती, गर्भवतींची प्रसूतिपूर्व काळजी तसेच बालकांचं लसीकरण या सेवाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हे अभियान २ ऑक्टोबर पर्यंत चालणार असून,सर्व महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे सांगून विविध कार्यक्रमात रत्नदान शिबिर घेतले जातात त्या माध्यमातून शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केलेले असते. त्याचा रुग्णांना नेहमीच फायदा होतो असे नमूद करता या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे प्राणिताताई यांनीं अहवान केले.

विशेष म्हणजे नांदेडहून आलेल्या अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने महिलांना मार्गदर्शन करून उपचार उपलब्ध करून दिले. वैद्यकीय अधीक्षक डॉ बारी यांनी या शिबिरातून महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, आजारांचे लवकर निदान करणे व वेळेवर उपचार देणे हा उद्देश साध्य झाल्याचे सांगितले आहे. प्राणिताताई यांनी दवाखान्यातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला महिला कर्मचारी यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या आणि त्या तात्काळ सोडण्या करिता संबंधित विभागाला सांगून त्या सोडवण्याचे सांगितले.


