Healthy Women : स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ आरोग्य अभियान माता भगिनींना समर्पित – प्राणिताताई देवरे चिखलीकर
लोहा| देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी उज्जवला गॅस ,शौचालय यासह महिला सशसक्तीरणासाठी अनेक योजना आणल्या आहेत. “स्वस्थ नारी-सशक्त परिवार” हे आरोग्य अभियान आपल्या माता आणि भगिनींसाठी समर्पित आहे. भारतातील एकही महिला आवश्यक सुविधा किंवा संसाधनांच्या अभावामुळे आजाराची बळी ठरू नये हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून लोहा उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी हे आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. केंद्र व राज्यातील सरकार आरोग्यविषयक अनेक जनहिताचे निर्णय घेत आहे. असे प्रतिपादन भाजपा महिला प्रदेश आघाडीच्या उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.
लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने महायुती सरकारच्या वतीने दिन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वस्थ नारी - सशक्त परिवार’ हे विशेष मोफत आरोग्य शिबिर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ...
